Pune Crime News : मागील काही दिवसांपासून पुण्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यातच आता पुण्यातून संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांकडून सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे आणि बाकी दोन जणांचा शोध सुरु आहे. शाळेतील समुपदेशनाच्या (Counseling) वर्गातून हा प्रकार उघडकीस आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 2018 ते 2019 दरम्यान घडला. अत्याचाराची ही घटना घडून 3 वर्ष झाली. साल 2018 ते 2019 दरम्यान ही घटना घडली. भीतीमुळे ही घटना समोर आली नाही. मुन्ना (वय 26, रा. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी अल्पवयीन मुलगी त्यावेळी इयत्ता सातवीत होती. 


या मुलीने शाळेत समुपदेशनाच्या वर्ग सुरु असताना हा प्रकार शिक्षकांना सांगितला. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आल्याने सगळीकडे खळबळ उडाली. 16 वर्षीय मुलीने पोलिसांत धाव घेतली. या तक्रारीवरुन कोंढवा पोलिसांनी लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण (पॉस्को) कायद्यांतर्गत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


वस्तू परत करायला गेल्यावर केला अत्याचार


ही मुलगी तिच्या घराशेजारी खेळत होती. त्यावेळी वार्डात असलेल्या एका घरातून वस्तू परत देण्यासाठी गेली होती. त्यावेळी या सगळ्यांनी तिला घरात ओढून तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर कोणाला हा प्रकार सांगितल्यास कुटुंबियांना त्रास देईन, अशी धमकी दिली होती. त्यामुळे या मुलीने तीन वर्ष हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता. मात्र शाळेतील समुदेशनाच्या वर्गातून हा प्रकार समोर आला. त्यामुळे अनेक शाळांमध्ये अशा प्रकारचे समुपदेशनाचे वर्ग घेणं गरजेचं असल्याचं बोललं जात आहे. या वर्गातूनच अनेक घटना पुढे आल्या आहेत. 


'गुड टच बॅड टच' कार्यक्रम गरजेचा


सध्या पुण्यात अनेक शाळांमध्ये शाळकरी मुलींसाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या समुपदेशनाचा वर्ग घेतला जातो. त्यात अनेक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. सायकोलॉजिस्ट किंवा इतर डॉक्टर प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसतात. या संवादातून विद्यार्थिनींना अनेक प्रकारचं मार्गदर्शन केलं जातं. लैंगिकतेबाबत माहिती दिली जाते. त्यासोबतच गुड टच बॅड टच याची देखील उत्तम प्रकारे माहिती दिली जाते. यामुळे विद्यार्थिनींना लैंगिक छळाबाबत माहिती मिळते. 


संबंधित बातमी-


Pune Love Jihad : पुण्यात लव्ह जिहादचा प्रकार? गोपीचंद पडळकरांचे गंभीर आरोप, चार वर्षांनी हिजाबमध्ये परतली मुलगी, नेमकं काय घडलं?