पुणे : लोकसभा निवडणूक 2024 साठी अखेर महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi  Seat Sharing Sormula Announced) फॉर्म्युला ठरला असून शिवसेना 21, राष्ट्रवादी काँग्रेस 10 आणि काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढणार आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील बारामती(Baramati Lok Sabha Constituency) , शिरुर (Shirur  Lok Sabha Constituency)), मावळ (Maval  Lok Sabha Constituency) आणि पुणे ( Pune Lok Sabha Constituency) या लोकसभा मतदार संघातील जागा जाहीर करण्यात आल्या आहे. पुणे लोकसभा कॉंग्रेस लढवणार आहे. मावळ लोकसभा मतदार संघ शिवसेना लढवणार आहे. शिरुर आणि बारामती हे दोन मतदार संघत शरद पवार गटाकडून लढवण्यात येणार आहे. 


बारामतीत राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे, पुणे लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेसचे रवींंद्र धंगेकर, मावळ लोकसभा मतदार संघातून शिवसेनेकडून संज्योग वाघेरे आणि शिरुर लोकसभा मतदार संघातून अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.


पुणे लोकसभा मतदारसंघ


रवींद्र धंगेकर (कॉंग्रेस) विरुद्ध मुरलीधर मोहोळ (भाजप), वसंत मोरे (वंचित)


मावळ पुणे लोकसभा मतदारसंघ


संज्योग वाघेरे (शिवसेना, ठाकरे गट) विरुद्ध श्रीरंग बारणे (शिवसेना, शिंदे गट)


शिरुर लोकसभा मतदारसंघ


अमोल कोल्हे (राष्ट्रवादी, शरद पवार गट) विरुद्ध आढळराव पाटील (राष्ट्रवादी, अजित पवार गट)


बारामती लोकसभा मतदारसंघ 


सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी, शरद पवार गट) विरुद्ध सुनेत्रा पवार (राष्ट्रवादी, अजित पवार गट)


कोणत्या लोकसभा मतदारसंघात कशी लढत?


पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदार संघात तगडी लढत बघायला मिळणार आहे. त्यात शिरुर आणि बारामतीत शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी लढत होणार आहे. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे. पवारांच्या बालेकिल्यात यंदा पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे. त्यामुळे या लोकसभा मतदार संघाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत तर सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी महायुतीचे सगळे नेते कामाला लागले आहे. 


त्यानंतर शिरुर लोकसभा मतदार संघातील लढतदेखील रंजक आहे. इथे देखील शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी लढत होणार आहे. शरद पवार गटातून अमोल कोल्हे तर अजित पवार गटातून आढळराव पाटील उभे ठाकले आहेत. काहीही झालं तरी अमोल कोल्हेंना पाडणार म्हणजे पाडणार, असा चंग अजित पवारांनी बांधला आहे. त्यामुळे अजित पवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. 


शिवाय पुण्यात रवींद्र धंगेकर (कॉंग्रेस) आणि मुरलीधर मोहोळ (भाजप), वसंत मोरे (वंचित) अशी तिहेरी लढत होणार आहे. यात तिन्ही तगडे उमेदवार मानले जात आहे. पुण्यात रवींद्र धंगेकरांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे नेते मैदानात आहेत तर मुरलीधर मोहोळांचा प्रचार करण्यासाठी राज्यातले भाजप नेते पुण्यात दाखल होणार आहे. त्यामुळी ही लढत अटीतटीची होणार आहेत. 


मावळमध्ये शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढत होणार आहे. त्यात संज्योग वाघेरे (शिवसेना, ठाकरे गट) विरुद्ध श्रीरंग बारणे (शिवसेना, शिंदे गट) अशी लढत होणार आहे. दोन्ही नेत्यांकडून प्रचारासाठी आणि जिंकण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहे. 


इतर महत्वाची बातमी-


महाविकास आघाडीचा 21-17-10 फॉर्म्युला जाहीर, कोण कुठल्या जागेवर लढणार?