एक्स्प्लोर

धक्कादायक! मामीची भाचीला विवस्त्र करून मारहाण , पोक्सो कायद्यांतर्गत पुण्यात गुन्हा दाखल

पिडीत भाची  आपल्या मामाकडे राहण्यास आली होती. मामा कामाला गेल्यानंतर मामी भाचीला विवस्त्र करुन मारहाण करत असे. तब्बल दोन वर्षानंतर हा प्रकार उघडकीस आला  आहे. 

 पुणे : पुणे (Pune) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सख्ख्या मामीनेच आपल्या भाचीला विवस्त्र करून मारहाण केली आणि त्यानंतर लैंगिक अत्याचार केला.  या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून  मामीला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय तरी काय सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय. मारहाणीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. 

काय आहे नेमकं प्रकरण?

पुणे जिल्ह्यातील हा धक्कादायक प्रकार आहे. अत्याचार झाला त्यावेळी पिडीत चिमुरडी अवघ्या नऊ वर्षाची होती.  मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार जानेवारी ते ऑगस्ट 2021 दरम्यान घडला आहे. पिडीत भाची  आपल्या मामाकडे राहण्यास आली होती. मामा कामाला गेल्यानंतर मामी भाचीला विवस्त्र करुन मारहाण करत असे. तब्बल दोन वर्षानंतर हा प्रकार उघडकीस आला  आहे. 

फिर्यादी महिलेने कोरोनाची लाट असताना तिच्या नऊ वर्षांच्या मुलीला भावाकडे राहण्यासाठी पुण्याला पाठवले होते. भाऊ हवाई दलात नोकरीला असल्याने त्याचे कुटुंब हवाई दल वसाहतीत राहते.मामा कामावर गेल्यावर पत्नी नणंदेच्या मुलीला विवस्त्र करून बेदम मारहाण करायची. याशिवाय तिने मुलीचे विवस्त्र फोटो काढून तिला जीवे मारण्याची धमकी देत होती. काही काळानंतर पीडित मुलगी तिच्या मूळ गावी गेल्यावर तिने मामाच्या घरी मामीने केलेला अत्याचार सांगितला. महिलेवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पोक्सो) विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली असून नराधम मामावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. 

बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय; 25 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या

बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून  एका 25 वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आलाय. पुण्यातील बालेवाडी  परिसरात ही घटना घडली. चतु: शृंगी पोलीस ठाण्यात ) या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. राजेश कांबळे (वय 25) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी राहुल शेषराव रिकामे (वय 20) आणि सय्यद जमीर उर्फ साहिल उर्फ बाब्या सय्यद नुर (वय 20) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका अल्पवयीन तरुणाने तक्रार दिली आहे.   

हे ही वाचा :

Pune Rape : भाऊच ठरला नराधम! भाऊ अन् त्याच्या मित्रांनी केले कर्णबधिर बहिणीवर लैंगिक अत्याचार

                                 

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe Pune FDA Action: पुण्यातील पेठाही आता FDAच्या रडारावर; अनेक मिठाईच्या दुकानावर छापे, 4 दिवसांत 45 लाख 70 हजार अन्नसाठा जप्त, 5 हॉटेलचे परवानेही निलंबित
पुण्यातील पेठाही आता FDAच्या रडारावर; अनेक मिठाईच्या दुकानावर छापे, 4 दिवसांत 45 लाख 70 हजार अन्नसाठा जप्त, 5 हॉटेलचे परवानेही निलंबित
Pune Baramati Crime News Mangesh Jagtap: 21 वर्षांचं प्रेम, लग्नाचे आमिष दाखवलं अन् महिलेसोबत नको ते केलं, अखेर पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य मंगेश जगतापांवर गुन्हा दाखल
21 वर्षांचं प्रेम, लग्नाचे आमिष दाखवलं अन् महिलेसोबत नको ते केलं, अखेर पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य मंगेश जगतापांवर गुन्हा दाखल
Maharashtra Rain : महाराष्ट्रभरात पावसाचं धुमशान! मुंबई- पुण्यासह विदर्भ मराठवाड्यातील 31 जिल्ह्यांना झोडपणार; हवामान विभागाचा इशारा काय? वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
महाराष्ट्रभरात पावसाचं धुमशान! मुंबई- पुण्यासह विदर्भ, मराठवाड्यातील 31 जिल्ह्यांना झोडपणार; हवामान विभागाचा इशारा काय? वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
Rohit Pawar: पुरावेच लागतात ना?, अंधभक्तांनो घ्या आता पुरावे.., रोहित पवारांचा पुन्हा खळबळजनक आरोप, थेट पुणे विद्यापीठाची प्रेसनोट दाखवली, गैरप्रकारांवर बोट
पुरावेच लागतात ना?, अंधभक्तांनो घ्या आता पुरावे.., आमदार रोहित पवारांचा पुन्हा खळबळजनक आरोप, थेट पुणे विद्यापीठाची प्रेसनोट दाखवली, गैरप्रकारांवर बोट

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime News: दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
Ramayana Part 1 Trailer Review: प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Embed widget