पुणे : शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातून (Pune Crime News) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वर्गात दंगा करत असल्याचे पाहून विद्यार्थी विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार पुण्यातील शाळेत घडला. या प्रकारामुळे पालकांनी मोठा संताप व्यक्त रेला आहे. पालकाने विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये शिक्षकेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. शिक्षिकेला काही शिस्त आहे की नाही, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.
नेमकं काय घडलं?
विद्यार्थी घोळका करून बसले असताना वर्गात दंगा करत असल्याचे पाहून विद्यार्थी विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार पुण्यातील शाळेतून समोर आला आहे. याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांनी विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. हा मारहाण करताना प्रकार विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये कैद केला. हा व्हिडिओ विद्यार्थ्यांच्या पालकांनी पाहिल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिसात शिक्षकेविरुद्ध तक्रार दाखल केली. पूजा केदारी असं शिक्षिकेचं नाव आहे. या पूजा केदारी यांनी मुलाला बेदम मारहाण केली आहे. त्यामुळे संस्थेने त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. यापूर्वी देखील या शिक्षिकेने बऱ्याच मुलांना बेदम मारहाण केली आहे, अशी माहिती समोर आल्याचं पालकांना समजलं आहे. पालकाने विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये शिक्षकेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
पालकांनी शिक्षिकेविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे आणि पालकांनी या शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी शाळा प्रशासन आणि पोलिसांकडे केली आहे. त्यातत घडलेल्या प्रकारामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम झाला तर जबाबदार कोण, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.
हा व्हिडीओ पाहून पालक चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी मुलाकडे विचारणा केली असता मुलाने मारहाण केल्याचं सांगितलं. तसेच पालकांनी शाळेत येऊन शिक्षिकेला जाब विचारला आणि हा प्रकार का केला?, असा प्रश्न विचारला त्यानंतर शिक्षिकेने मुलं गोंगाट करत होते. हा गोंगोट सहन न झाल्याने मारहाण केल्याचं सांगितलं. त्यानंतर पालकांनी शिक्षिकेला चांगलंच सुनावलं आणि पोलिसांत तक्रार केली.
इतर महत्वाची बातमी-
Junnar Leopard Attack : साखर झोपेतच चिमुकलीला पळवलं; आई-वडिल संतापले; बिबट्यांचे हल्ले कधी थांबणार?
Vijay Shivtare : फाटली, पलटी मारली, अजित पवार मंचावर असताना विजय शिवतारे काय काय म्हणाले?