निंबूत, पुणे : राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून शरद पवारांनी (Sharad PawarMeet kakde Family) प्रतिस्पर्धींच्या आणि जुन्या कट्टर विरोधकांच्या भेटी गाठी घेण्याचा सिलसिला सुरुच ठेवल्याचं दिसत आहे. शरद पवारांनी आज त्यांच्या उमेदीच्या काळापासून ते आतापर्यंत असलेले कट्टर प्रतिस्पर्धी काकडे कुटुंबिय़ांची भेट घेतली आहे. साधारण 55 वर्षांनी शरद पवार हे काकडे कुटुंबियांच्या भेटीला गेले आहेत. त्यासोबतच मार्च महिन्यात देखील कट्टर विरोधक असलेले अनंतराव थोपटेंची भेट घेतली होती. या दोन्हीभेटीने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. बारामती लोकसभेच्या (Baramati Loksabha Election) निवडणुकीची सध्या राज्यात चांगली चर्चा रंगते आहे. पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळणार आहे. त्यास शरद पवार हे सुप्रिया सुळेंसाठी मैदानात उतरले आहे. लेकीसाठी आणि बारामती लोकसभेसाठी पवारांची जुळवाजुळव सुरु असल्याचं दिसत आहे. 


राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून शरद पवारांकडून पक्षबांधणी सुरु आहे. त्यातच शरद पवार अशा जुन्या लोकांच्या भेटी घेताना दिसत आहेत. पक्षबांधणी करताना जुन्या विरोधकांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न शरद पवार करताना दिसत आहेत. जने मतभभेद संपवून परत एकत्र येण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत. मार्च महिन्यात त्यांनी अनंतराव थोपटेंची भेट घेतली होती. अनंतराव थोपटे हे मागील अनेक वर्षांपासून शरद पवारांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जात होते. बारामतीच्या सभोवताली अनेक नेत्यांशी त्यांनी संघर्ष केला आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. अनेकांनी हा संघर्ष जवळून पाहिला आहे.


याच प्रकारचा संघर्ष बारामतीत काकडे कुटुंबियांशी होता. हा संघर्ष साधारण 55 वर्ष गाजला मात्र आता काकडे कुटुंबातील नवी पीढी साखर कारखान्याच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न सुरु झाला होता. मात्र आता या भेटीमुळे आणखी दोन पावलं पुढं गेल्याचं दिसत आहे. या भेटीच्या माध्यमातून अनेक वर्षांच्या संघर्ष दूर करण्याचा किंवा तणाव कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे आणि बेरजेचं राजकारण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होताना दिसत आहे, असं राजकीय विश्लेषक अभय देशांपांडेंनी सांगितलं आहे. 


काका पुतण्याच्या राजकीय भवितव्याची निवडणूक


शरद पवारच  नाही तर अजित पवारांनीदेखील कंबर कसली आहे. त्यात अजित पवारांच्या पत्नीनेदेखील थोपटेंची भेट घेतली होती. ही निवडणूक काका पुतण्यांच्या भवितव्याची असणार आहे. त्यामुळे काका-पुतणे जुन्या विरोधकांच्या भेटी घेताना दिसत आहेत. 


भेटींच्या फायदा होणार?


अनंतराव थोपटे यांनी भेट विचारपूस करण्यासाठी घेतली होती आणि आता काकडे कुटुंबियांची भेट ही सांत्वनपर जरी असली तरीही ही भेट अनेक वर्षांपासूनचा संघर्ष मिटवणारी ठरू शकते आणि याचा फायदादेखील या निवडणुकीत होऊ शकतो. 


इतर महत्वाची बातमी-


Sharad Pawar Meet Kakde family : 55 वर्षांनी राजकीय वर्तुळ पूर्ण? शरद पवार घेणार कट्टर प्रतिस्पर्धी काकडे कुटुंबीयांची भेट; कारण ठरलं...