पुणे : चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीचा गळा चिरुन खून (Murder) केल्याची घटना पुण्यातील (Pune) येरवडा भागात घडली. लग्नाच्या अवघ्या दीड वर्षानंतर पतीने संशयातून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (9 सप्टेंबर) घडला. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. तर विमानतळ पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून भांडण आणि शिवीगाळ
रुपाली उर्फ बबिता भोसले (वय 35 वर्षे) असं खून झालेल्या महिलेचं नाव असून आशिष भोसले (वय 32 वर्षे) असं अटक केलेल्या आरोपी पतीचं नाव आहे. या प्रकरणी स्वप्नी बाळासाहेब खांडवे यांनी विमानतळ पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपी आशिष भोसलेला अटक केली आहे.
रुपाली आणि आशिष यांचं लग्न दीड वर्षांपूर्वी झालं होतं. लोहगावमधील संतनगरमध्ये ते भाड्याने घेतलेल्या घरात राहत होते. आशिष हॉटेलमध्ये साफसफाईचे काम करतो तर रुपाली धुणे-भांडी करुन घर चालवत होती. त्यांना सात महिन्यांची मुलगी देखील आहे. मात्र मागील काही दिवसांपासून रुपालीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आशिष आला होता. त्यातून त्याने अनेक वेळा तिच्याशी भांडणही केलं होतं. शनिवारी रात्री आशिषने जोरदार भांडणं करुन रुपालीला शिवीगाळ केली.
चाकूने वार करुन पत्नीने जखमी केलं, उपचाराआधीच प्राण सोडले
या दरम्यान आशिषने धारदार चाकूने पत्नीच्या गळ्यावर, मानेवर आणि पोटावर वार करुन तिला जखमी केले. या घटनेबाबत समजताच शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. तर रुपालीला उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र जखमा अतिशय गंभीर स्वरुपाच्या असल्याने उपचारांआधीच तिचा मृत्यू झाला होता.
विमानतळ पोलिसांकडून तपास सुरु
परीमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विला सोंडे हे घटनास्थळी दाखल झाले. पत्नीची हत्या केल्याप्रकरणी आरोपी पती आशिष भोसलेला अटक करण्यात आली. विमानतळ पोलीस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय धामणे हे या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.
हेही वाचा
Pune Crime News : पुण्यातील 'त्या' खुनाला अनैतिक संबंधाची किनार; आरोपी अटकेत