Pune Crime News : पुण्यात सध्या गुन्हेगारीचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्या महिलांबाबतच्या (Pune crime) छळाच्या गुन्ह्यांची संख्या जास्त आहे. अश्लील व्हिडीओ (Pornographic Video) व्हायरल करण्याची धमकी देऊन एकाने तरुणीकडून 10 लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. सौरभ सुपेकर असं या तरुणाचं नाव आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाने 22 वर्षीय मुलीसोबत जबरदस्तीने लग्नाचा आग्रह करुन तिच्याशी विवाह केला. त्यानंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्तापित केले. यावेळी तिचे अश्लील व्हिडीओ काढले आणि ते व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तिच्याकडून 10 लाख रुपये उकळले. हा सगळा प्रकार 2020 पासून सुरु होता. ते दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. जबरदस्तीने तरुणीसोबत 11 ऑक्टोबर 2021 रोजी रजिस्टर लग्न केलं. त्यानंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्तापित केले. त्यानंतर तो कायम व्हिडीओ काढायचा. तेच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडे पैशाची मागणी करत होता. तिच्याकडून त्याने आतापर्यंत 10 लाख रुपये उकळले. 


गुन्हेगारीत वाढ


पुण्यात गुन्हेगारीत वाढ झाली आहे. त्यासंदर्भातील रोज नवे प्रकरणं समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी पॉर्नस्टार होण्याचे स्वप्न दाखवत मित्रानेच मैत्रिणीचा अश्लील व्हिडीओ पोर्न वेबसाईटवर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. पुण्यातील वारजे परिसरात हा प्रकार घडला होता. या प्रकरणात ते दोघेही जण अल्पवयीन असल्याचे तपासातून पुढे आले होते. वारजे पोलिस ठाण्यात याप्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोघांची सोशल मीडियावरुन ओळख झाली होती. दोघेही एकमेकांना भेटले देखील होते आणि त्यानंतर त्यांची मैत्री वाढत गेली. मित्राने तिला आंतरराष्ट्रीय पॉर्नस्टार बनवतो, असं आमिष दाखवलं त्यानंतर तिला अश्लील व्हिडीओ तयार करायला सांगितलं. मुलाच्या सांगण्यावरुन तिने स्वत:चा अश्लील व्हिडीओ तयार देखील केला. मित्रावर असलेला विश्वासावर तिने हे कृत्य केलं. मात्र त्याच मित्राने तिला धोका दिला. त्या मित्राने सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ मागून घेतले आणि एका पॉर्न वेबसाईटवर अपलोड होते.


महिलांसंदर्भात गुन्ह्यांच्या संख्येत वाढ


पुण्यात सध्या गुन्हेगारी वाढत जात आहे. त्यात महिलांसंदर्भातील छळाच्या, बलात्काराच्या आणि सायबर गुन्ह्यांच्या संख्येत अति प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या गुन्ह्यांची संख्या रोखण्यासाठी पोलिसांचे मोठे प्रयत्मदेखील सुरु आहे.