Pune Crime : हळदी समारंभातील (Haldi Ceremony) स्पीकरच्या (Speaker) आवाजावरुन निर्माण झालेला वाद पुण्यातील (Pune) एका ज्येष्ठ नागरिकाच्या (Senior Citizen) जीवावर बेतला आहे. वादादरम्यान अपमानित झालेल्या या ज्येष्ठ नागरिकाने बंडगार्डन पुलावरुन (Bund Garden Bridge) नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या (Suicide) केली. ज्ञानेश्वर साळुंखे (वय 70 वर्षे) असं आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचं नाव आहे. तर या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.


नेमकं काय घडलं?


येरवडा पोलीस ठाण्याच्या (Yerwada Police Station) हद्दीत ही घटना घडली. याबाबत पांडुरंग ज्ञानेश्वर साळुंखे (वय 47 वर्षे) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. नवी खडकी परिसरात तक्रारदार ज्ञानेश्वर साळुंखे यांच्या घराशेजारी चेतन बेले राहतात. त्यांच्या घरात 28 मे रोजी हळदीचा कार्यक्रम सुरु होता. हळदीच्या कार्यक्रमात मोठ्या आवाजात स्पीकर सुरु होता. मात्र स्पीकरच्या आवाजाचा त्रास होत असल्याने ज्ञानेश्वर साळुंखे यांनी त्या ठिकाणी जाऊन आवाज कमी करा, मोठ्या आवाजाचा आम्हाला त्रास होतो, असं सांगितलं. यावरुन आरोपींनी त्यांना अपमानित केलं आणि तिथून हाकलून दिलं. यानंतरही बराच वेळ मोठ्या आवाजात गाणी सुरु होती. त्यामुळे ज्ञानेश्वर साळुंखे यांनी पुन्हा त्या ठिकाणी जाऊन आवाज कमी करण्यास सांगितलं. यावेळी आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ज्ञानेश्वर साळुंखे यांच्या घरातील लोक त्यांना सोडवण्यासाठी गेले असता कुटुंबियांनाही आरोपींनी मारहाण केली. यावेळी चेतने बेले याने तक्रारदार पांडुरंग साळुंखे यांना डोक्यात कोयता मारुन जखमी केलं. त्यानंतर ते येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. या गोष्टीचा राग मनात धरुन आरोपींनी पुन्हा एकदा तक्रारदार पांडुरंग साळुंखे यांच्या वडिलांना म्हणजेच ज्ञानेश्वर साळुंखे यांना मारहाण केली. मारहाणीमुळे झालेल्या वेदना आणि अपमान सहन न झाल्याने ज्ञानेश्वर साळुंखे यांनी बंडगार्डन पुलावरुन नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली.


पाच जणांना अटक


पांडुरंग साळुंखे यांच्या तक्रारीवरुन येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर चेतन बेले (वय 26 वर्षे), देवेश ऊर्फ नन्या पवार (वय 18 वर्ष), यश मोहिते (वय 19 वर्ष), शाहरुख खान (वय 26 वर्ष), जय तानाजी भडकुंभे (वय 22 वर्षे) या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.


हेही वाचा


Pune Crime news : पांघरुणासाठी दिलेली चादर आरोपीने कापली अन् बाथरुमध्ये गळफास घेतला; विश्रामबाग पोलिसांच्या लॉकअपमध्येच आरोपीने संपवलं आयुष्य