2000 Rs Note: एकीकडे दोन हजाराची नोट आरबीआयने (RBI) चलनातून मागे घेतली आणि दुसरीकडे काही दुकानदार दोन हजाराची नोट (2000 Rs Note) स्वीकारुन कमाल ऑफर्स देत आहेत. पुण्यातील राजहंस पुस्तक पेठेने एक आगळीवेगळी स्कीम काढली आहे. तर, अमरावतीच्या प्रसिद्ध रघुवीर स्वीट्सने देखील 2,000 रुपयांच्या नोटेवर 2,100 रुपयांची मिठाई देण्याची आकर्षक ऑफर (Special Offer) सुरू केली आहे.


पुण्यात 2,000 ची नोट देऊन 2,500 ची पुस्तकं


दोन हजाराची नोट चलनातून मागे घेतली जाणार, असं कळल्यानंतर लोकांमध्ये पुन्हा एकदा गोंधळ उडाला. मात्र आता पुणेकरांना आणि अमरावतीकरांना रांगेत उभे राहून नोट बदलून घ्यायची गरज नाही. पुण्यातील राजहंस पुस्तक पेठेने एक भन्नाट स्कीम आणली आहे. '2000 ची नोट द्या आणि 2500 ची पुस्तकं घेऊन जा' हे असं काहीतरी याआधी तुम्ही ऐकलं होतं का? नाही ना? तर पुण्यातील राजहंस प्रकाशनने ही अद्भूत ऑफ ग्राहकांनी देऊ केली आहे. ही स्कीम आणखी 15 दिवस असणार आहे, त्यामुळे पुणेकरांना या स्कीमचा चांगलाच फायदा घेता येणार आहे. 


दोन हजाराची नोट चलनातून मागे घेण्याचा निर्णय अरबीआयने घेतला आणि लोकांचा गोंधळ उडाला. मात्र, राजहंस प्रकाशनने या संधीचं सोनं करायचं असं ठरवलं. नोटबंदी झाली तेव्हा सगळ्यांना टेन्शन आलं होतं आणि हा निर्णय आल्यानंतर सगळ्यात पाहिला ग्राहकांचा विचार डोक्यात आला आणि मग ही स्कीम राजहंस पुस्तक पेठेला सूचली. या स्किमने लोकांचा 2,000 ची नोट बदलून घेण्याचा प्रश्न देखील सुटेल आणि लोक त्यानिमित्ताने पुस्तकं देखील खरेदी करतील. 'एक तीर से दो निशान' असं काहीसं या स्किमच्या माध्यमातून साध्य करता येणार आहे. 


अमरावतीत 2,000 ची नोट द्या अन् 2100 ची मिठाई घ्या


रिझर्व्ह बँकने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून 30 सप्टेंबरपर्यंत बँकांमध्ये जमा करण्याच्या सूचना दिल्या. दोन हजाराच्या नोटा बँकेत जमा करणं किंवा बदलणं याबाबत लोक चिंतेत आहेत. मात्र अमरावती येथील प्रसिद्ध रघुवीर स्वीट्सने या अडचणीच्या काळात खास ऑफर अंतर्गत अमरावतीकरांना दिलासा देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. 2,000 च्या नोटांच्या बदल्यात 2,100 रुपयांच्या वस्तू खरेदी करता येतील, अशी ही ऑफर आहे. 


गृहिणींसह अनोकांना 2,000 च्या नोटा बदलण्याची किंवा बँकेत जमा करण्याची चिंता असते. अनेक दुकानांत 2000 च्या नोटा स्वीकारत नाहीत. अशा कठीण काळात, रघुवीर मिठाई येथे एका विशेष ऑफर अंतर्गत 2000 च्या नोटा बदलून घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. रघुवीर मिठाई दुकानात 2,100 रुपयांच्या खरेदीची ऑफर दिली जात आहे, ज्यात प्रत्येक व्यक्तीला 100 रुपयांची अतिरिक्त खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.


सरकारकडून 2000 च्या नोटा जमा करण्याची अंतिम तारीख जाहीर होईपर्यंत नागरिकांसाठी ही खास ऑफर सुरू ठेवण्याची घोषणा रघुवीर स्वीट्सच्या संचालकांनी केली आहे.


हेही वाचा:


Maharashtra Cabinet Decision : शेतकऱ्यांना मोठा दिलासा; एक रुपयात मिळणार पीक विमा, अर्थसंकल्पातील घोषणेला मंत्रिमंडळाची मंजुरी