Pune Crime News : पुण्यातील अनिरुद्ध शेठ या (Pune crime) चार्टर्ड अकाऊंटंटवर त्याच्या ऑफिसमधील रिसेप्शनिस्ट महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिसेप्शनिस्ट महिलेला पेस्ट्री आणि कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजून अनिरुद्धने बलात्कार (rape) केल्याचा आणि त्याचा व्हिडीओ तयार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अनिरुद्ध शेठ आपल्यावर गेल्या काही दिवसांपासून बलात्कार करत होता, असाही त्याच्यावर आरोप आहे. येरवडा पोलीस ठाण्यात अनिरुद्ध शेठवर गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 50 वर्षीय महिला सीए असलेल्या अनिरुद्ध शेठ याच्या ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून कार्यरत होती. मागील काही वर्षांपासून त्यांच्यावर अनिरुद्ध शेठकडून सतत लैंगिक अत्याचार सुरु होता, असा आरोप महिलेने केला आहे. 2019 ते 2022 या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी एका 50 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. अनिरुद्ध शेठ महिलेला फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने भूगावला घेऊन गेला होता. त्यावेळी त्याचा वाढदिवस असल्याचं सांगितलं. त्यानंतर पेस्ट्री आणि कोल्ड्रिंग दिली. यात गुंगीचं औषध टाकण्यात आलं होतं. गुंगीचं ओषध देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते. या सगळ्याचा त्याने व्हिडीओ रेकॉर्ड केला होता आणि हा व्हिडीओ दाखवून मानसिक त्रास देत होता आणि व्हायरल करण्याची धमकी देत होता, असा आरोप महिलेनं केला आहे.


वेगवेगळ्या शहरात ठेवले शरीर संबंध 


मार्च 2019 मध्ये हा प्रकार घडला होता. या सीएने अनेक बहाण्याने बाहेर घेऊन जात त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पुण्यातच नाही तर बाकी शहरात देखील कामानिमित्त नेत त्यांचा लैंगिक छळ केला. पुण्यातच नाही तर मुंबई आणि अलिबाग येथील हॉटेलमध्ये आणि येरवड्यातील महाराष्ट्र हाऊसिंग कॉलनीत वेळोवेळी हा प्रकार घडला, असल्याचं महिलेनं म्हटलं आहे. त्यामुळे या त्रासाला आणि धमकीला कंटाळून महिलेने पोलिसांत तक्रार केली आहे. त्यानुसार सीएवर गुन्हा दाखल केला आहे. 


महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर 
पुण्यातच नाही तर राज्यभरात तरुण मुलीच नाही तर मोठ्या वयाच्या महिलांवर देखील अत्याचार होण्याचं प्रमाण वाढत आहे. सुरुवातीला महाविद्यालयीन मुलींसोबत असे अत्याचार जास्त प्रमाणत घडत असल्याच्या घटना समोर येत होत्या, मात्र आता नराधमांनी 50 वर्षीय महिलांकडेही वासनेच्या नजरेने पाहण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे सगळ्या वयोगटातील स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.