Pune Crime : पुण्यातील (Pune Crime)  थेऊरच्या जय मल्हार हॉटेल जवळ किरकोळ वादातून फायरिंग (Pune Firing) करण्यात आलीये. प्लॉटिंगच्या वॉचमनने लघवी करणाऱ्या अज्ञात कारमधील टोळक्याला हटकल्यानंतर कार मधील चौघांनी वॉचमन आणि त्याच्या पत्नीला मारहाण करत हवेत फायरिंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. ही घटना पुण्यातील (Pune Crime लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. अज्ञातानी  दगड आणि हाताने केलेल्या माराहाणीत वॉचमन अक्षय चव्हाण आणि त्याची पत्नी शीतल चव्हाण जखमी झाले आहेत.


वॉचमनने लघवी करणाऱ्या अज्ञात कारमधील टोळक्याला हटकल्याने घडला प्रकार 


अधिकची माहिती अशी की, प्लॉटिंगच्या वॉचमनने लघवी करणाऱ्या अज्ञात कारमधील टोळक्याला हटकलं. त्यानंतर संतापलेल्या टोळक्याने वॉचमन अक्षय चव्हाण आणि त्याची पत्नी शीतल चव्हाण यांना जबर मारहाण करत गोळीबार केलाय. मारहाण करणाऱ्या अज्ञात कार चालकासह तिघा जणाला लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. भानुदास शेलार अजय मुंडे आणि सतीश उर्फ नाना शेलार या तिघासह एक जणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 


हवेत गोळीबार करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न


त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घढलीये. मात्र, यावेळी आरोपींनी हवेत गोळीबार करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. किरकोळ कारणावरून हवेत गोळीबार करण्यात आलाय. पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडलाय. गोळीबार करत घटनास्थळावरून आरोपीकडून पळून जाण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. लघुशंका करत असताना हटकल्याने इसमाला मारहाण करत करण्यात आला तसेच हवेत गोळीबार करण्यात आलाय. अक्षय साहेबराव चव्हाण असं फिर्यादीचे नाव असून,मारहाणीत फिर्यादीची पत्नी जखमी झाली आहे. लोणीकंद पोलिसांकडून गोळीबार करणाऱ्या 3 आरोपींना अटक केलीये. यातील एकाने हवेत गोळीबार केला होता. यावेळी आरोपींकडून हत्यार जप्त देखील करण्यात आलं आहे. पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल दाखल करण्यात आलाय. 


पुण्यात पुन्हा गोळीबार 


किरकोळ कारणावरून हवेत गोळीबार 


पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला प्रकार


गोळीबार करत घटनास्थळावरून आरोपीकडून पळून जाण्याचा प्रयत्न


लघुशंका करत असताना हटकल्याने इसमाला मारहाण करत करण्यात आला तसेच हवेत गोळीबार


अक्षय साहेबराव चव्हाण असं फिर्यादीचे नाव,मारहाणीत फिर्यादीची पत्नी जखमी 


लोणीकंद पोलिसांकडून गोळीबार करणाऱ्या ३ आरोपींना अटक,यामधे एकाने केला होता हवेत गोळीबार


आरोपींकडून हत्यार देखील करण्यात आला जप्त 


पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Beed Morcha: भाषणापूर्वी लोकांनी बोंबा मारल्या, मग भाषण ऐकलं, रेणापुरात संतोष देशमुखांची लेक धाय मोकलून रडली, रडत रडत म्हणाली..


Pune Accident: धक्कादायक! गॅरेजमध्ये उभ्या असेलेल्या सीएनजी रिक्षामध्ये स्फोट; एकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू, तिघे जखमी