पुणे : पुण्यात एक अपघाताची (Pune Accident) विचित्र घटना घडली आहे. पुण्यातील बी टी कवडी रोडवर रिक्षाचा मोठा अपघात झाला आहे. यात गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या सीएनजी रिक्षामध्ये अचानक स्फोट झाल्याची घटना घडली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की रिक्षातील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात इतर तीन लोक जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. पुण्यातील बी.टी.कवडे रस्ता, नवशा गणपतीपुढे भंगार मालाचा साठा असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये हा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.
एकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू, तिघे जखमी
पुढे आलेल्या माहितीनुसार, आज (27 डिसेंबर) संध्याकाळी 5.30 च्या सुमारास बी.टी. कवडे रोड येथील एका भंगाराच्या दुकानांमध्ये जुन्या फ्रिजच्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की या घटनेत एका व्यक्तिचा जागीच मृत्यू झाला असून इतर तीन व्यक्ति जखमी झाले आहेत. या जखमी व्यक्तींना कामी हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले आहे. आम्ही स्वतः घटनास्थळावर असून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करून घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र या अपघाताच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र हा अपघात नेमका कश्यामुळे झाला हे अद्याप कळू शकलेले नाही.
रिक्षा अपघातात माय-लेकाचा दुर्दैवी अंत
अशीच एक अपघाताची घटना नागपूरात घडली असून रिक्षा अपघातात माय लेकाचा दुर्दैवी अंत झालाय. रिक्षाची दुभाजकाला घडक बसली आणि पलटी झाला. यातच खासगी कार्यक्रमावरुन येत असलेल्या माय-लेकाने जीव गमावलाय. ही घटना आज (दि.27) नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आटो चालक रोहित साखरे व त्याची आई करुणा साखरे असं अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं आहेत.
खासगी कार्यक्रमावरुन येत असाताना रिक्षाची डिव्हायडरला धडक बसली
अधिकची माहिती अशी की, एका खासगी कार्यक्रमावरुन येत असाताना रिक्षाची डिव्हायडरला धडक बसली. या अपघातात माय-लेकाचा मृत्यू झालाय. हिंगणा-वाडी बायपासवर मध्यरात्री 12 वाजता प्लास्टो कंपनी समोर आटो चालक रोहित साखरे व त्याची आई करुणा साखरे एक खाजगी कार्यक्रम आटोपून घरी जात असताना ही घटना घडली आहे. ऑटोवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव ऑटो आधी दुभाजकावर आदळला व उलटला यात चालक रोहित व मागच्या प्रवासी सीटवर बसलेली त्याची आई करुणा दोघांनाही डोक्यावर व हातापायाला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा