एक्स्प्लोर

Pune Covid Update : कोरोना अलर्ट! पुणे विमानतळावर आजपासून प्रवाशांचं थर्मल स्क्रीनिंग सुरु होणार

पुण्यात कोरोनाच्या खबरदारीचा भाग म्हणून पुणे विमानतळावर बाहेर देशातून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग सुरू करत आहे, असं PMC अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी सांगितले.

Pune Covid Update : चीन आणि देशाच्या (covid) काही भागांमध्ये (pune) कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे सगळीकडे खबरदारी घेतली जात आहे. याच सगळ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुणे महापालिकादेखील सज्ज झाली आहे. खबरदारीचा भाग म्हणून पुणे विमानतळावर बाहेर देशातून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग सुरु करत आहे, असं PMC अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी सांगितले.

खबरदारीच्या उपायांचा भाग म्हणून पीएमसीने लोकांना कोविडच्या नियमांचं पालन करण्याचे आवाहन केलं आहे. परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असेही ते म्हणाले. पुण्यात सध्या 44 सक्रिय कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. चाचणीसाठी आरटीपीसीआर केंद्रे पुन्हा सुरु केली जातील आणि वॉर्ड कार्यालयांच्या माध्यमातून गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

विमानतळ संचालक संतोष ढोके यांनीही महानगरपालिकेचे अधिकारी थर्मल स्क्रीनिंग करणार असल्याची माहिती दिली आहे. पुणे विमानतळावर दुबई, सिंगापूर आणि बँकॉकसाठी प्रत्येकी एकासह तीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे आहेत. सिंगापूर आणि बँकॉकची उड्डाणे गेल्या महिन्यात जोडण्यात आली होती, तर दुबईची फ्लाईट बऱ्याच महिन्यांपासून सुरु आहे. आयटी हब असल्याने शहरात अनेक कंपन्या आहेत ज्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहेत. याशिवाय अनेक परदेशी विद्यार्थीही पुण्यात शिक्षण घेतात. त्यामुळे खबरदारी घेण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

आम्ही गुरुवारपासून विमानतळावर आमच्या अधिकार्‍यांची एक टीम तैनात केली आहे आणि आंतरराष्ट्रीय विमानाने येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला थर्मल स्क्रीनिंग करावी लागेल. शिवाय, प्रवाशांच्या आरटी पीसीआर चाचण्या करण्यासंदर्भात आम्ही केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करु, पीएमसीच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ आशिष भारती यांनी सांगितलं आहे. 

बूस्टर डोस घेण्याचं आवाहन

पुण्यातच नाही तर देशभरातील अनेक नागरिकांनी अजूनही बूस्टर डोस घेतला नाही आहे. त्यामुळे नागरिकांना बूस्टर डोस घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे. 

मार्गदर्शक सूचना

• सोशल डिस्टन्सिंगचं काही प्रमाणात पालन करावं.
• विमानतळावर आरोग्य अधिकार्‍यांनी सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग केले पाहिजे.
• स्क्रीनिंग दरम्यान लक्षणे आढळलेल्या प्रवाशांचं ताबडतोब विलगीकरण करण्यात येणार आहे. आरोग्य प्रोटोकॉलनुसार नियुक्त वैद्यकीय सुविधेत नेले जाईल.
• सर्व प्रवाश्यांनी आगमनानंतर त्यांच्या आरोग्याचे स्व-निरीक्षण केले पाहिजे आणि त्यांच्या जवळच्या आरोग्य सुविधेला देखील कळवावे किंवा त्यांना कोणतीही सूचक लक्षणे आढळल्यास राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक (1075)/राज्य हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करावा.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Police: तपासाच्या नावाखाली 'कास पठार'ची सफर अंगलट; महिला अधिकाऱ्यासह 3 पोलिसांना दणका; दोन वर्षांची इन्क्रीमेंट थांबवली
तपासाच्या नावाखाली 'कास पठार'ची सफर अंगलट; महिला अधिकाऱ्यासह 3 पोलिसांना दणका; दोन वर्षांची इन्क्रीमेंट थांबवली
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
Pune Crime News: बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Baramati Crime News: 14 वर्षांचे प्रेमसंबंध अन् वारंवार शारीरिक संबंध, लग्नाचं फक्त अमिष दाखवलं..., 8-10 लाख तिच्याकडून उकळले; पुणे जिल्हा परिषदेचे सदस्याच्या प्रेमप्रकरणाबाबत पोलिसांची माहिती
14 वर्षांचे प्रेमसंबंध अन् वारंवार शारीरिक संबंध, लग्नाचं फक्त अमिष दाखवलं..., 8-10 लाख तिच्याकडून उकळले; पुणे जिल्हा परिषदेचे सदस्याच्या प्रेमप्रकरणाबाबत पोलिसांची माहिती

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget