एक्स्प्लोर
सात कप्प्यांची कापडी पिशवी, पुण्याच्या महिलेची 'डोकॅलिटी'
पुण्यातील वारजे भागात राहणाऱ्या समिधा संगरेड्डीकर यांनी सात कप्प्यांची कापडी पिशवी तयार केली आहे.
पुणे : प्लास्टिक पिशव्या बंद झाल्यापासून घरातून कापडी पिशवी न्यावी लागते किंवा हातातून सामान नेण्याशिवाय पर्याय नसतो. त्यातच जर अनेक वस्तू बाजारातून विकत आणायच्या असतील, तर एकाच कापडी पिशवीतून नेणं प्रचंड गैरसोयीचं होतं. मात्र पुण्याच्या समिधा संगरेड्डीकर यांनी त्यावर सॉल्लिड 'डोकॅलिटी' लावली आहे.
प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आल्यानंतर सात कप्प्यांच्या कापडी पिशवीत ठेवलेल्या भाज्यांच्या फोटो तुम्ही सोशल मीडियावर पाहिला असेल. पुण्यातील वारजे भागात राहणाऱ्या समिधा संगरेड्डीकर यांनी ही पिशवी तयार केली आहे.
समिधा यांनी तयार केलेल्या कप्प्यांच्या पिशवीची कल्पना अनेकांना रुचली आहे. या पिशवीमुळे आपण अनेक भाज्या विकत घेतल्या, तरी त्यांची सरमिसळ होत नाही. त्यामुळे घरी आल्यावर भाज्या निवडण्याचं काम सोपं होऊन जातं.
पुण्यातील दुकानांमध्ये सरसकट ही पिशवी मिळत नसली, तरीही ऑनलाईन विक्री मात्र सुरु आहे. दैनंदिन आयुष्यात गरजेच्या असलेल्या या पिशवीच्या विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement