पुण्यात भर रस्त्यात वाहतूक पोलिसांवर लोखंडी रॉडनं हल्ला
तळेगाव-चाकण चौकात वाहतूक नियमन करत असणाऱ्या पोलीस कर्मचारी रवींद्र करवंदे यांना लोखंडी रॉडने मारहाण करत केल्याच्या घटनेनं सध्या खळबळ

पुणे : पोलिसांवर हल्ला होण्याची गंभीर घटना पुन्हा एकदा पुण्यातून समोर आली आहे. पुण्यातील चाकण परिसरात तळेगाव-चाकण चौकात वाहतूक नियमन करत असणाऱ्या पोलीस कर्मचारी रवींद्र करवंदे यांना लोखंडी रॉडने मारहाण करत केल्याच्या घटनेनं सध्या खळबळ माजवली आहे.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळं जखमी अवस्थेत पोलीस कर्मचारी जागीच बेशुद्ध झाले. ज्यानंतर त्यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. सदर प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
रवींद्र करवंदे हे त्यांचं कर्तव्य बजावत असतानाच शनिवाारी दुपारच्या सुमारास तळेगाव चाकण चौकात पाहतूक कोंडी झाली होती. ज्यानंतर त्यांनी आरोपीचा कंटेनर पाठीमागे घेण्यास सांगितलं. ज्यानंतर पोलीस आणि आरोपींमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. हा राग मनात सदर इसमांनी दुचाकीवरुन येत करवंदे यांच्यावर लोखंडी रॉडनं हल्ला करत घटनास्थळावरुन पळ काढला.
आरोपी रोहित साळवी आणि हर्षदीप कांबळे असे आरोपीची नावे हे दोघेही मुंबईचे रहिवासी असून, या दोन्ही आरोपींना गुन्हे शाखा-3 च्या पथकाने केली आहे जिथं त्यांनी या गुन्ह्याची कबुलीही दिल्याचं कळत आहे.
Before You Go
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर






















