Pune By poll Voting Live Updates : पुणेकरांचा मतदानाला अल्प प्रतिसाद! पाच वाजेपर्यंत कसब्यात 45.25 टक्के तर चिंचवडमध्ये 41.1 टक्के मतदान

पुणे जिल्ह्यातील कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या दोन्ही ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 Feb 2023 07:04 PM
पुणेकरांची मतदानाला पाठ; कसब्यात पाच वाजेपर्यंत 45.25 टक्के तर 41.1 टक्के मतदान

कसबा विधानसभा मतदार संघात पाच वाजेपर्यंत 45.25 टक्के मतदान पार पडलं तर चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी 41.1 टक्के मतदान पार पडलं. चिंचवडमध्ये सकाळी 7 ते 9 या वेळेत 3.52 टक्के, 9 ते 11 या वेळेत 10.45 टक्के. 11 ते 1 या वेळेत 20.68 तर 1 ते 3 या वेळेत 30.55 टक्के मतदान झाले आहे. कसबा पेठ मतदारसंघात सकाळी 7 ते 9 या वेळेत 6.5 टक्के, 9 ते 11 या वेळेत 8.25 टक्के. 11 ते 1 या  वेळेत 18.50 तर 1 ते 3 या वेळेत 30.05 टक्के मतदान झाले होते. कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठीचे मतदान सकाळपासूनच अत्यंत संथगतीने सुरू असल्याचे पाहायला मिळालं


 

खासदार गिरीश बापट आजारी असूनही मतदानासाठी हजर

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी पुण्याच्या अहिल्या शाळेत मतदानाचा हक्क बजावला. मागील अनेक वर्षांपासून त्यांनी कसब्यावर राज्य केलं आहे.

कसब्यात सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 30.05 टक्के मतदान

कसबा विधानसभा मतदार संघात  सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत झालेल्या एकूण 30.05 टक्के मतदान झालं. 

चिंचवडमध्ये सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 30.55 टक्के मतदान

चिंचवड विधानसभा मतदार संघात  सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत झालेल्या एकूण 30.55 टक्के मतदान झालं. 

गणेश बिडकर मतदारांना पैसे वाटत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप

पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात भाजपचे महापालिकेतील गटनेते गणेश बिडकर हे मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केलाय.  सोमवार पेठेतील एका इमारतीत गणेश बिडकर हे भाजपच्या इतर कार्यकर्त्यांसह पैशांच वाटप करत असताना कॉंग्रेसचे कार्यकर्ते तिथे पोहचले आणि त्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमधे झटापट देखील झाली असं कॉंग्रेस कार्यकर्त्यांच म्हणनय.  या व्हिडीओ मधे गणेश बिडकर कॉंग्रेस कार्यकर्त्यावर धावून जाताना दिसतायत.  त्यानंतर कॉंग्रेसचे कार्यकर्ते तक्रार देण्यासाठी समर्थ पोलीस ठाण्यात पोहचलेत.

कसब्यात 7 ते 1 वाजेपर्यंत 18.65 टक्के मतदान

कसब्यात 7 ते 1 वाजेपर्यंत 18.65 टक्के मतदान झालं आहे. चिंचवडच्या तुलनेत दोन टक्के कमी मतदान आतापर्यंत पार पडलं आहे. 

कसब्यात 7 ते 1 वाजेपर्यंत 18.65 टक्के मतदान

कसब्यात 7 ते 1 वाजेपर्यंत 18.65 टक्के मतदान झालं आहे. चिंचवडच्या तुलनेत दोन टक्के कमी मतदान आतापर्यंत पार पडलं आहे. 

चिंचववडमध्ये 7 ते 1 वाजेपर्यंत 20.68 टक्के मतदान

चिंचवड विधानसभेत सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत 20.68 टक्के मतदान पार पडलं आहे. पाच वजोपर्यंत मतदान होणार आहे. 

मतदान करतानाचे मोबाईलमध्ये चित्रीत; गोपनीयतेचा भंग

चिंचवड विधानसभा मतदारसंघात अनेक मतदारांचा आततायीपणा दिसून येतोय. आपण कोणत्या उमेदवाराच्या बाजूने आहे हे दाखवण्याच्या हव्यासातून मतदान करतानाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केलं जातंय. यामुळं मतदानाच्या गोपनीयतेचा ही भंग होतोय. निवडणूक आयोगाच्या उपाययोजनांवर ही प्रश्न उपस्थित झालेत.

मतदान करतानाचे मोबाईलमध्ये चित्रीत; गोपनीयतेचा भंग

चिंचवड विधानसभा मतदारसंघात अनेक मतदारांचा आततायीपणा दिसून येतोय. आपण कोणत्या उमेदवाराच्या बाजूने आहे हे दाखवण्याच्या हव्यासातून मतदान करतानाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केलं जातंय. यामुळं मतदानाच्या गोपनीयतेचा ही भंग होतोय. निवडणूक आयोगाच्या उपाययोजनांवर ही प्रश्न उपस्थित झालेत.

आज एकटाच मतदानाला आलो, मुक्ता यांची कायम उणीव भासेल; शैलेश टिळक

कायम दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्यासोबत मतदानाला यायचो आणि त्यांनाच मतदान करायचो. मात्र आज त्या आपल्यात नाही आहे आणि त्यांच्यात निधनानंतप पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे आज एकटाच मतदानाला आलो आहे. मुक्ता टिळकाची आज उणिव भासत आहे, अशा भावना दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी व्यक्त केली आहे.

आज एकटाच मतदानाला आलो, मुक्ता यांची कायम उणीव भासेल; शैलेश टिळक

कायम दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्यासोबत मतदानाला यायचो आणि त्यांनाच मतदान करायचो. मात्र आज त्या आपल्यात नाही आहे आणि त्यांच्यात निधनानंतप पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे आज एकटाच मतदानाला आलो आहे. मुक्ता टिळकाची आज उणिव भासत आहे, अशा भावना दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी व्यक्त केली आहे.

7 ते 11 वाजेपर्यंत चिंचवडमध्ये 10.45 टक्के मतदान

चिंचवजमध्ये सकाळी लवकर मतदानाला अनेकांनी प्राधान्य दिलं. सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत 10.45 टक्के मतदान झालं. 

अपक्ष उमेदवार आनंद दवे यांनी बजावला मतदानाचा हक्क

अपक्ष उमेदवार आनंद दवे यांनी मतदान केलं.  खडकमाळ आळी येथील एपिफनी शाळेत मतदान केलं.  पैसे वाटप आम्ही कारवाई मागणी करणार आहेत आणि मी मी 8 ते 10 हजार फरकाने निवडून येईल, असा विश्वास दवे यांनी व्यक्त केला.

लंडनहून तरुणी थेट मतदानासाठी पुण्यात

मतदान हा आपला अधिकार आणि तो हक्क आहे सगळ्यांनी तो केलाच पाहिजे, अशी भूमिका पुढे घेऊन जात अमृता देवकर ही तरुणी थेट लंडनहून आज पुण्यात पोहचली. तब्बल 12 तासाहून अधिक प्रवास करून आलेल्या अमृता यांनी पुण्यात येताच थेट मतदान केंद्र गाठलं आणि मतदानाचा हक्क बजावला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी स्वतःचा मतदानाचा हक्क बजावताना ईव्हीएम मशीनचा काढला फोटो

कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानाच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी स्वतःचा मतदानाचा हक्क बजावताना ईव्हीएम मशीनचा फोटो काढून गोपनीयतेचा भंग केला आहे. निवडणूक आयोग या प्रकरणाची गंभीर दखल घेणार का असा? प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.



सकाळी 9:30 वाजेपर्यंत कसब्यात 6.5 टक्के मतदान

कसबा मतदार संघात 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी 9:30 वाजेपर्यंत कसब्यात 6.5 टक्के मतदान झालं. 

अश्विनी जगतापच विजयी होतील; खासदार श्रीरंग बारणे

खासदार श्रीरंग बारणे यांनी चिंचवड पोटनवडणुकीसाठी थेरगाव येथील संचेती विद्यालयात सपत्नीक मतदानाचा अधिकार बजावला. महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना पोषक वातावरण आहे. त्या निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे. ही तिरंगी लढत नसून दुरंगी लढत आहे. जेव्हा निकाल बाहेर तेव्हा कळेल की ही दुरंगी लढत होती. त्यामुळे अश्विनी जगतापच विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

गणेश जगताप आणि माजी नगरसेवक सागर आंघोळकर पोलिसांच्या ताब्यात

चिंचवडमध्ये गणेश जगताप आणि माजी नगरसेवक सागर आंघोळकर यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून  धक्काबुक्की झाली. परंतु पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप केल्यामुळे  परिस्थिती निवळली.  दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं आहे. 

खासदार श्रीरंग बारणे हे थोड्याच वेळात मतदानाचा हक्क बजावणार

खासदार श्रीरंग बारणे हे थोड्याच वेळात थेरगाव येथील संचेती विद्यालयात मतदान करण्यासाठी येतील.

माजी नगरसेवक सागर अंघोळकर आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचे समर्थक यांच्यामध्ये हाणामारी

माजी नगरसेवक सागर अंघोळकर आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचे समर्थक यांच्यामध्ये हाणामारी झाली आहे. पिंपळ गुरव माध्यमिक विद्यालय मतदान केंद्राबाहेर ही झटापट झाली. हा सगळा प्रकार पाहून पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.  भाजपच्या उमेदवार अश्विनी जगतापांनी मतदान केलं केंद्रावरच वाद झाल्याने खळबळ उडली आहे.  मतदान केंद्रावर थांबण्यावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 

चिंचवडमध्ये 7 ते 9वाजेपर्यंत झालेल्या एकूण 3.52 टक्के मतदान

चिंचवड विधानसभा मतदार संघात आज रविवार 26 फेब्रुवारी रोजी मतदान सुरु आहे. या मतदार संघामध्ये एकूण 5 लाख 68 हजार 954 मतदार असून 510मतदार केंद्रावर मतदान होत आहे. सकाळी 7 ते 9वाजेपर्यंत झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी- 3.52% आहे.

255 मतदान केंद्रावर वेबकास्टींगच्या सहाय्याने लक्ष

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील 135 आणि चिंचवड मतदारसंघातील  255 मतदान केंद्रावर वेबकास्टींगच्या सहाय्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख हे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून संपूर्ण मतदान प्रक्रीयेवर लक्ष ठेवून आहेत.

लक्ष्मण जगताप यांच्या मुलांचं पहिलंच मतदान आईसाठी
पुणे जिल्ह्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. तर या निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांच्या मुलाने त्याचं पहिलं मतदान आईसाठी केलं आहे. 
मतदान केंद्रांवर नागरिकांच्या रांगाच रांगा...

पुण्यातील अनेक नागरिकांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावण्याकडे कल दिसत आहे. त्यासाठी कसबा आणि चिंचवड मतदार संघातील अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या. यात ज्येष्ठ नागरिकांचा जास्त प्रमाणात सहभाग आहे. सकाळी मतदान हे महत्वाचं काम आटपूनच दिवसाची सुरुवात करायची, अशा भावना मतदारांनी व्यक्त केल्या आहेत. 

विकएंड एन्जॉय करणाऱ्या आयटीतील नागरिकांनीदेखील सकाळी लवकर मतदानाचा हक्क बजावला

चिंचवडमध्ये महाराष्ट्राच्या विविध शहरातून पुण्यात स्थायिक झालेल्या मतदारांची संख्या जास्त आहे. यातील अनेक लोक आयटी कंपनीत काम करतात.  विकएंड एन्जॉय करणाऱ्या आयटीतील नागरिकांनीदेखील सकाळी लवकर मतदानाचा हक्क बजावला. 

ज्येष्ठांनी सकाळीच बजावला मतदानाचा हक्क

कसबा आणि चिंचवड दोन्ही मतदार संघात मतदान पार पडत आहे. सकाळी अनेकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यात ज्य़ेष्ठ नागरिकांचा जास्त प्रमाणात सहभाग होता. 

Pune Bypoll Voting : कसबा पेठ मतदारसंघात वीस लाखांची रोकड जप्त, मतदानासाठी पैसे वाटल्याची घटना समोर

Pune Bypoll Voting : पुण्यातील कसबा पेठची निवडणूक गाजत आहे. दोन्ही बाजूंकडून होणाऱ्या पैसै वाटपाच्या आरोपांमुळं. या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संपुर्ण मतदारसंघात टु व्हीलरवरुन आणि कारमधून संपुर्ण मतदारसंघात पेट्रोलिंग करायच ठरवलंय. काल रात्री पैसै वाटताना पकडलेल्या दोन घटनांमधे गुन्हे दाखल करण्यात आलेत. आतापर्यंत कसबा पेठ मतदारसंघात वीस लाखांची रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीप सिंग गील यांनी दिलीय.  मतदारांनी पोलीस यंत्रणेवर विश्वास ठेवून मतदानासाठी अधिकाधिक संख्येनं भारतात बाहेर पडावं असं आवाहन त्यांनी केलय. 

Pune Bypoll Voting : कसबा पेठ मतदारसंघात वीस लाखांची रोकड जप्त, मतदानासाठी पैसे वाटल्याची घट

Pune Bypoll Voting : पुण्यातील कसबा पेठची निवडणूक गाजत आहे. दोन्ही बाजूंकडून होणाऱ्या पैसै वाटपाच्या आरोपांमुळं. या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संपुर्ण मतदारसंघात टु व्हीलरवरुन आणि कारमधून संपुर्ण मतदारसंघात पेट्रोलिंग करायच ठरवलंय. काल रात्री पैसै वाटताना पकडलेल्या दोन घटनांमधे गुन्हे दाखल करण्यात आलेत. आतापर्यंत कसबा पेठ मतदारसंघात वीस लाखांची रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीप सिंग गील यांनी दिलीय.  मतदारांनी पोलीस यंत्रणेवर विश्वास ठेवून मतदानासाठी अधिकाधिक संख्येनं भारतात बाहेर पडावं असं आवाहन त्यांनी केलय. 

Nana kate : नाना काटेंच्या लेकीचं पहिलंच मत वडिलांना...

Nana kate : चिंचवडचे महविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या मुलीने पहिल्यांदाच वडीलांसाठी मतदान केलं आहे. तनिष्का काटेने आपले पाहिले मत वडिलांना दिले आहे.अनेक जण मतदान करतात परंतु माझे आयुष्यातील पहिले मत हे माझ्या वडिलांना देता आले हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे सांगितले. 

Nana Kate : चिंचवडचे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटेंनी बजावला मतदानाचा हक्क

Pune Bypoll Voting : चिंचवडचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. नाना काटे हे पी. के. इंटरनॅशनल स्कूल पिंपळे सौदागर इथं नाना काटेंनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

Pune Bypoll Voting : कसबामध्ये दोन्ही बाजूंकडून मध्यरात्रीपर्यंत आरोप-प्रत्यारोप, मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप

Pune Bypoll Voting : मतदानाच्या आदल्या रात्री पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात दोन्ही बाजूंकडून मध्यरात्रीपर्यंत आरोप प्रत्यारोप सुरु होते. शुक्रवार पेठ, रविवार पेठ, मिठगंज पोलीस चौकी अशा वेगवेगळ्या भागात हे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याच पहायला मिळाल. मतदारांना पैसे वाटपाचा आरोप दोन्ही बाजूंकडून करण्यात आला आहे. पुण्यातील कसबा पेठची निवडणूक किती खुप अटीतटीने लढली जातेय. 

Pune Bypoll Voting Live Updates :  कसबा चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक 2023 साठी मतदानाला सुरुवात

Pune Bypoll Voting Live Updates :  कसबा चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक 2023 साठी मतदानाला सुरुवात झाली आहे. चिंचवडचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे हे थोड्याच वेळात मतदानासाठी येणार आहेत. नाना काटे हे पी. के. इंटरनॅशनल स्कूल पिंपळे सौदागर येथे मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 

पार्श्वभूमी

Pune Bypoll Election Voting Live Updates : पुणे जिल्ह्यातील कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या दोन्ही ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे.  निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप (BJP) उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात उतरले होते. भाजपने मोठी ताकद प्रचारात लावली होती. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता. दरम्यान, आज मतदार कोणाच्या पारड्यात मतदान टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला


चिंचवडमध्ये तिरंगी लढत होत आहे तर कसबामध्ये दुहेरी लढत होत आहे. कसबा मतदार संघात  भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या विरोधात काँग्रेसचे रविंद्र धंगेकर निवडणूक लढवत आहेत. तर चिंचवडमध्ये तिंरगी लढत होत आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगतात तेथून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे निवडणूक लढवतायेत. तर अपक्ष म्हणून राहुल कलाटे निवडणुकीच्या मैदानात आहेत. या निवडणुकीच्या निमित्तानं मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे नेते भाजपच्या उमेदावाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते. तर महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सतेज पाटील आदी नेत्यांनी प्रचारात जोर लावला होता. आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडल्या. त्यामुळे मतदार कोणाला कौल देणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 


कसबामध्ये पावने तीन लाख तर चिंचवडमध्ये साडेपाच लाखाहून अधिक मतदार 


270 मतदान केंद्रांवर कसबा मतदारसंघातून दोन लाख 75 हजार 428 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर चिंचवडमध्ये या मतदार संघामध्ये एकूण 5 लाख 68 हजार 954 मतदार असून 510 मतदार केंद्रावर मतदान होणार आहे. दरम्यान, आज पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.