एक्स्प्लोर

Pune Bypoll election : मतदानाला काहीच तास बाकी असताना अभिजित बिचुकलेची अजब मागणी; म्हणाले दोन्ही...

Pune Bypoll : कसबा विधानसभा पोट निवडणूकच्या मतदानाला काही तास बाकी असताना अनेक नाट्यमय घटना घडताना दिसत आहेत. कसबा पोटनिवडणूक रद्द करावी, अशी मागणी अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Pune Bypoll election : कसबा विधानसभा पोटनिवडणूकच्या (Pune Bypoll Election) मतदानाला काही तास बाकी असताना अनेक नाट्यमय घटना घडताना दिसत आहेत. कसबा पोटनिवडणूक रद्द करावी, अशी मागणी अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले (abhijit bichukle) यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. अभिजीत बिचुकले हे कसबा पोटनिवडणुकीचे अपक्ष उमेदवार आहेत. शुक्रवारी संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या असताना देखील भाजप आणि कॉंग्रेसने प्रचार केला असल्याचा आरोप अभिजीत बिचुकले यांनी केला आहे. कसब्याचा तिसरा उमेदवार म्हणून मी कसब्याच्या दोन उमेदवारांवर कारवाई करण्याचं पत्र देत असल्याचं ते म्हणाले. ही निवडणूक प्रक्रिया रद्द करा आणि नव्यानं घ्या अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.

भाजपा पक्ष कसब्यात पोटनिवडणुकीत पैसे वाटत असल्याचा आरोप मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. पोलीस प्रशासनदेखील भाजपवर कारवाई करीत नसल्याचा आरोप करीत धंगेकरांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. त्यामुळे भाजपने देखील मतदानावर आक्षेप घेत धंगेकारांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कसबा गणपती समोर केलेले उपोषण हा आचारसंहितेचा भंग आहे,  म्हणून ही निवडणुक रद्द करण्याची मागणी बिचुकले यांनी केली आहे. 

भारतीय जनता पक्षाकडून कॉंग्रेसचे कसबा पेठचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, यासाठी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यानंतर आता अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. रविंद्र धंगेकर यांनी कसबा गणपती समोर आंदोलन करुन आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल आणि धंगेकरांच्या सभेत धार्मिक धृवीकरण करण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल भाजपने तक्रार दाखल करणार आहे. आचारसंहितेचा भंग करत आज रविंद्र धंगेकर उपोषणाला बसले होते असा आरोप भाजपने केला आहे. 

अभिजित बिचुकले हेदेखील कसब्यातून अपक्ष उमेदवार आहे. त्यांनीदेखील मागील काही दिवस प्रचार केला. प्रत्येक दारादारात जाऊन त्यांनी प्रचार केला. काहीही झालं तरी मी निवडणूक लढवीन अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली होती. आज भाजप आणि महाविकास आघाडी यांनी आचारसंहितेचा भंग केला, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी निवडणूकच घेऊ नका. ती रद्द करा, अशी मागणी केली आहे. भाजपच्या आणि अभिजित बिचुकले यांच्या मागणीवर नेमकं निवडणूक आयोग काय भूमिका घेणार ? हे पाहणं महत्वाचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis On Pune Flex :
"उद्या माझे नावाचे बेकायदा होर्डिंग लागले, तर..."; पुण्यातील कारवाईचं फडणवीसांकडून कौतुक, नेमकं काय म्हणाले सीएम?
Sunetra Pawar: कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेणार नाही; पुण्यातील हल्ल्याच्या घटनेनंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, अधिकाऱ्यांना दिल्या कडक कारवाईच्या सूचना
कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेणार नाही; पुण्यातील हल्ल्याच्या घटनेनंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, अधिकाऱ्यांना दिल्या कडक कारवाईच्या सूचना
Sunetra Pawar On Rohit Pawar: काकींना ताकद द्या किंवा कठोर पालकमंत्री द्या, रोहित पवारांचं विधान; पत्रकारांनी प्रश्न विचारताच सुनेत्रा पवारांनी काय केलं?
काकींना ताकद द्या किंवा कठोर पालकमंत्री द्या, रोहित पवारांचं विधान; पत्रकारांनी प्रश्न विचारताच सुनेत्रा पवारांनी काय केलं?
सुनेत्रा पवारांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची टीका; अमोल मिटकरींचा पलटवार, रोहित पवारांना केलं लक्ष्य
सुनेत्रा पवारांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची टीका; अमोल मिटकरींचा पलटवार, रोहित पवारांना केलं लक्ष्य

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
RJD Delimitation Bill Support : मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
Embed widget