पुणे: मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पुण्यातील कसबा पेठेच्या पोटनिवडणुकीसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यासाठी भाजपकडून मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक उमेदवारी अर्ज भरणार आहेत, तर महाविकास आघाडी शनिवारी आपला उमेदवार जाहीर करणार आहे. अशातच आता आणखी एक इंटरेस्टिंग माहिती समोर आली असून कसबा पेठेच्या निवडणुकीत (Pune Bypoll Election) आता अभिजीत बिचुकलेची (Abhijit Bichukale) एन्ट्री झाली आहे. अभिजीत बिचुकलेच्या पत्नी अलंकृता बिचुकले (Alankruta Bichukale) या निवडणुकीसाठी अर्ज भरणार आहेत अशी माहिती समोर येत आहे. 


कसबा पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र घेतलं आहे. शिवसेनेतील संजय मोरे, विशाल धनवडे तर वंचित बहुजनकडून भेंगडे यांनी उमेदवारी अर्ज  घेतलं आहे. भाजपकडून शैलेश टिळक यांची उमेदवारी निश्चित असून त्यांनीही आज नामनिर्देशन पत्र घेतलं. काँग्रेसकडून कौस्तुभ गुजर तर राष्ट्रवादीकडून नलावडे यांनी उमेदवारी अर्ज घेतलं आहे. 


आता या सर्व घटनांनंतर अभिजित बिचुकले (Abhijit Bichukale) याच्या पत्नी अलकृंता बिचुकले यांनी अर्ज घेतला आहे. तर सात अपक्षानी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीसाठी चुरस वाढणार असल्याचं दिसून येतं. 


वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत 


बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले याने आजवर अनेक निवडणुका लढवल्या आहेत. आपल्या वेगवेगळ्या स्टंट आणि वक्तव्याने तो कायम चर्चेत असतो.  खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्याने निवडणुकीच्या माध्यमातून अनेकदा खुलं आव्हान दिलं आहे. अनेक निवडणुका लढवल्या असल्या तरी बिचुकलेला अद्याप यश आलेलं नाही. '2019 चा मुख्यमंत्री मीच ठरवणार', असं बेधडक वक्तव्यही त्याने केलं होतं. गेल्या लोकसभा निवडणुकीत बिचुकले यांनी अपक्ष अर्ज दाखल करत अनामत रक्कम म्हणून 12 हजार 500 रुपयांची चिल्लर जमा केली होती. 


महाराष्ट्राची पहिली महिला मुख्ममंत्री ही आपली पत्नी, अलंकृता बिचुकले असेल असं वक्तव्य काहीच दिवसांपूर्वी अभिजीत बिचुकले याने केलं होतं. अलंकृताला पहिली महिला मुख्यमंत्री करणारच, त्यासाठी काहीही करेन असंही त्याने म्हटलं होतं. 


मनसेच्या गजानन काळे यांच्यावर टीका


काही दिवसांपूर्वी मनसेचे प्रवक्ते गजनान काळे यांनी अभिजित बिचुकले यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना अभिजीत बिचुकलेने त्यांच्यावर भयंकर टीका केली होती. 


ही बातमी वाचा: