एक्स्प्लोर

पुण्यात उड्डाणपुलावरुन दुचाकी कोसळून साहसी बाईकरचा मृत्यू

पुणे : उड्डाणपुलावरुन दुचाकी खाली पडल्यामुळे पुण्यात बाईकर तरुणाचा मृत्यू झाला. जगातल्या सर्वात उंच शिखरांपैकी खारदुंगला टॉपची चढाई यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आशुतोष फडकेला पुण्यातील उड्डाणपुलाने मात्र धोका दिला. सोमवारी सकाळी पुण्यातील कर्वे रस्त्यावर असलेल्या पौड फाट्यावरील वीर सावरकर उड्डाणपुलावरुन 35 वर्षीय आशुतोष प्रवास करत होता. मात्र त्यावेळी बाईक पुलावरुन खाली कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या आशुतोषचं उपचारांपूर्वीच निधन झालं. फडके ऑटोमोबाईल्सचा मालक असलेला आशुतोष स्वत:ची केटीएम दुचाकी घेऊन कर्वे रस्त्यावरुन पौड रोडने कोथरुड डेपोकडे जात होता. त्यावेळी पौड फाट्यावरील वीर सावरकर उड्डाणपुलावर असताना दुचाकीवरील त्याचं नियंत्रण सुटलं आणि तो दुचाकीसह पुलावरुन खाली कोसळला. फोटो : फेसबुक फोटो : फेसबुक आशुतोषला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात आणण्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. आशुतोषला दुचाकींसह चारचाकी स्पोर्टी वाहनं चालवण्याची आवड होती. त्याने जगातील सर्वोच्च शिखरांपैकी एक असलेल्या, तब्बल 18 हजार 380 फुट उंचीवर असलेल्या खारदुंगला टॉपची यशस्वी चढाई केली होती. जिथे ऑक्सिजनचीही कमतरता असते, तिथे त्याने यशस्वीरीत्या दुचाकीने चढाई केली. मात्र पुण्यातील उड्डाणपुलाने त्याचा बळी घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे. कारगिलसारख्या ठिकाणीही दुचाकीने प्रवास केला होता. तर राजमाची, लवासा, महाबळेश्वर अशा घाट रस्त्यांवर फोर्स गुरखा, रॉयल एन्फिल्ड थंडरबर्ड, केटीएम ड्युक ही वाहनं चालवून रस्त्यांनाच आव्हान दिलं होतं. फोटो : फेसबुक फोटो : फेसबुक

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ, दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; संघाच्या बैठकीत निर्णय, महागाईचं दिलं कारण
सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ, दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; संघाच्या बैठकीत निर्णय, महागाईचं दिलं कारण
Pune Crime News: आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mantralaya Clerk Protest : मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
NCP Merger : मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,15-16 मतांची त्यांना गरज, कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
NCP Merger: मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
Gold Rate Weekly Update : सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
Kaziranga Accident : मोठी बातमी, आसामच्या काझीरंगामध्ये राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, ट्र्क-बसच्या अपघातात 23 जणांचा मृत्यू,मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
आसामच्या काझीरंगामध्ये भीषण अपघात, ट्र्क-बसच्या अपघातात 23 जणांचा मृत्यू,मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
Nvidia Spy Controversy : चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
Embed widget