पुणे : पुण्यातील (Pune News) भोरमध्ये एसटी बस स्थानकात (Bhor ST Stand) चाकाखाली चिरडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.रुपेश गायकवाड असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. सोमवारी दुपारी ही घटना घडली आहे. बस स्थानकात असलेल्या cctv मध्ये ही घटना कैद झाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, रुपेश गायकवाड तरुण बसच्या समोरून डाव्या बाजूनं पलीकडे उजव्या बाजूला जात असताना अचानक बस चालकाने बस पुढं घेतली. यावेळी बसचं चाक अंगावरून गेल्यानं रुपेश याचा मृत्यू झाला. रुपेशच्या पायाला दुखापत झाल्याने तो लंगडत लंगडत चालत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. पायाला असलेल्या दुखापतीमुळे रुपेशला वेदना होत होत्या. त्यामुळे तो हळू हळू चालत एसटीजवळ आला आणि उभा राहिला होता. रुपेश उभा राहिल्यानंतर काही क्षणातच एसटी चालकाने बस पुढे घेतली.एसटी बस वेगाने पुढे येताच रुपेशला पायाच्या दुखापतीमुळे पटकन बाजूला होता आलं नाही आणि तो बसखाली चिरडला गेला.
मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला
या घटनेची माहिती मिळताच भोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह भोर उपविभागीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पुढील तपास भोर पोलीस करत आहे. घटनेनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अलिबाग वडखळ रोडवरील कार्ले खिंडीत अपघात
अलिबाग वडखळ रोडवरील कार्ले खिंडीत सकाळी 7.45 ची अलिबाग वरून पनवेल दिशेने जाणारी बस axel तुटल्याने पलटी झाल्याची बातमी समोर येतं आहे. मात्र सुदैवाने वाहन चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एका झाडाला टेकवत थांबविली, यामुळें मोठा अनर्थ टळला सर्व प्रवाशी सुखरूप असल्याच कळतंय.
हे ही वाचा :
Samruddhi Highway Cracks : समृद्धी महामार्गाला एवढ्या लवकर तडे पडलेच कसे? MMRDC चा सवाल, सात दिवसात उत्तर द्या!
Nashik Accident : कसारा घाटात भीषण अपघात, कंटेनरची सात वाहनांना जोरदार धडक, 13 प्रवासी जखमी