Pune ATS News : पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांच्या तपासाबाबत नवी माहिती समोर आली आहे. पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांनी ज्या गाडीचा वापर केला त्या गाडी मालकाची देखील एटीएसकडून चौकशी केली जात आहे. मोहम्मद इमरान खान आणि मोहम्मद युनूस साकी यांनी मुंबईतून पळून आल्यानंतर पुण्यात कार खरेदी केली होती. ज्या व्यक्तीकडून ही कार घेण्यात आली होती त्याची देखील एटीएसने चौकशी केली आहे.
मोहम्मद इमरान खान आणि मोहम्मद युनूस साकी या दोघांना पुण्यातील कोथरुड परिसरात गाड्यांची चोरी करत असल्याने पकडण्यात आलं होतं. त्यानंतर पोलिसांना संशय वाढला आणि त्यांनी या दोघांच्या घरात झाडाझडती घेतली होती. त्यावेळी त्यांच्याकडील याच कारमध्ये एटीएसला 2 पिस्टल आणि 5 जिवंत काडतुसं सापडली होती. त्यांची सखोल चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडे स्फोटकं, बॉम्ब बनवण्यासाठी लागणारं साहित्य आणि बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. हे सगळं पाहता त्यांच्या गाडी मालकाची एटीएसकडून चौकशी करण्यात य़ेत आहे. पुणे दहशतवादी प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) जाण्याची शक्यता आहे. "रतलाम मोड्युल" शी निगडित असलेले हे दोघे ही दहशतवादी यांचा चौकशी एनआयए करण्याची शक्यता आहे. अल सुफा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेले हे दोघेही एनआयएच्या रडारवर होते
साथीदारांना बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण
आरोपींनी त्यांच्या साथीदारांकरता बॉम्ब बनवण्याचं शिबीर (Workshop) आयोजित केलं होतं. आरोपीकडून बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आलं आहे, ज्यामध्ये केमिकल्स, केमिकल पावडर, लॅब इक्विपमेंट्स त्यामध्ये थर्मामीटर, पिपेट असे साहित्य जप्त करण्यात आलं आहे. बॉम्ब तसेच प्रशिक्षण शिबीर आयोजित करुन ज्या ठिकाणी बॉम्बचे साहित्य पुरुन ठेवलं होतं त्या ठिकाणाहून केमिकल्स आणि केमिकल्स पावडरसह इतर साहित्य एटीएसने हस्तगत केलं आहे. महाराष्ट्र एटीएसने आतापर्यंत या प्रकरणात पाच आरोपींना अटक केली आहे.
कोंढव्यातील दहशतवादी मोड्युल्स एकमेकांच्या संपर्कात
एनआयए आणि एटीएस या दोन वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी (Maharashtra ATS, NIA Module) उद्ध्वस्त केलेली पुण्याच्या कोंढवा भागातील दहशतवाद्यांची मोड्युल्स एकमेकांच्या संपर्कात होती आणि एकमेकांना मदतही करत होती, हे आता स्पष्ट झालं आहे. कारण एनआयएने अटक केलेला झुल्फीकार अली बरोडावाला हा एटीएसने अटक केलेल्या मोहम्मद युसुफ खान आणि मोहम्मद युनुस साकी या दोघांना पैसै पुरवत असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसने एनआयएच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या बरोडावालाचा ताबा घेऊन त्याची चौकशी सुरु केली.
इतर महत्वाच्या बातम्या-