एक्स्प्लोर

Pune Bypoll election :  भाजपला कसबा-चिंचवडची पोटनिवडणूक हाताळता आली नाही; अजित पवारांचा हल्लाबोल

भाजपला कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक हाताळता आली नाही. कसबा आणि चिंचवड मतदार संघाचा एकदा निकाल लागू द्या मग भाजपकडून काय घडलंहे सगळं सांगतो, असा हल्लाबोल विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केला आहे.

Pune Bypoll election :   भाजपला कसबा आणि चिंचवडची  (Pune Bypoll Election) पोटनिवडणूक हाताळता आली नाही. कसबा आणि चिंचवड मतदार संघाचा एकदा निकाल लागू द्या, मग चिंचवड आणि कसब्यात भाजपकडून काय घडलं आणि त्यांनी काय केलं हे सगळं सांगतो, असा हल्लाबोल विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केला आहे. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते बोलत होते.

ते म्हणाले की, कसबा आणि चिंचवडच्या मतदारांचा मी आदर करतो मात्र या निवडणुकीसाठी पुण्यात भाजपच्या अनेक नेत्यांना तळ ठोकून बसावं लागलं. भाजप नेते गिरीष महाजन यांच्यासहित अनेक भाजप नेत्यांना तीन-चार दिवस पुण्यात तळ ठोकून बसावं लागलं. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील कसब्यात आणि चिंचवडमध्ये प्रचारासाठी उतरावं लागलं, असाही टोला त्यांनी विरोधकांना लगावला. 

आम्ही खूप चांगला विरोध केला...

या पोटनिवडणुकीत आमच्य महाविकास आघाडीने अत्यंत चांगल्या पद्धतीने विरोध करण्याता प्रयत्न केला. ही पोटनिवडणूक भाजपला नीट हाताळता आली नाही. ही पोटनिवडणूक भावनेची होती मात्र तरीही ही पोटनिवडणूक भावनेची होऊ दिली नाही. कसब्यात विरोधी पक्षाने चांगली मेहनत केली. अनेक नेते मंडळी ठाण मांडून बसले होते. मोक्का लागलेल्या लोकांना प्रचारात सामील करण्यात आलं होतं, असाही आरोप त्यांनी केला आहे.

व्हायरल एक्झिट पोल कुणाच्या बाजूने?

जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसंबंधी दोन एक्झिट पोल व्हायरल होत आहेत. त्यामध्ये कसब्यामध्ये भाजपला धक्का बसणार असून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर विजयी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर चिंचवडची जागा मात्र भाजप राखणार असून अश्विनी जगताप या विजयी होतील असं म्हटलं आहे. स्ट्रेलिमा या संस्थेने जाहीर हा एक्झिट पोल जाहीर केला आहे. या पोल नुसार कसब्यात भाजपला धक्का बसणार आहे तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. हा एक्झिट पोल सध्या व्हायरल होत आहे. 

2019 च्या तुलनेत मतदान कमी


कसबा मतदारसंघासाठी 2019 मध्ये 51.64 टक्के मतदान झालं होतं. यावेळी 50.06 टक्के मतदान झालं आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 4,540 मतं कमी आहेत. त्यात लोकमान्य नगर आणि नवीपेठ परिसरात मागील वर्षीपेक्षा कमी मतदान झालं आहे. ही सगळी आकडेवारी पाहता कसब्यात नेमकी कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Pune Extortion : स्पर्धा परीक्षा क्लास चालकाला लाखोंची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी; पुण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
स्पर्धा परीक्षा क्लास चालकाला लाखोंची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी; पुण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
धक्कादायक! IAS अधिकारी असल्याचे सांगत तब्बल 35 लाख रुपयांना घातला गंडा, 21 वर्षीय तरुणाचा प्रताप, आरोपीला अटक 
धक्कादायक! IAS अधिकारी असल्याचे सांगत तब्बल 35 लाख रुपयांना घातला गंडा, 21 वर्षीय तरुणाचा प्रताप, आरोपीला अटक 
Pune Doctor Cyber Fraud : 'विश्वास नांगरे पाटलांचा पीए बोलतोय' म्हणत पुण्यातील महिला डॉक्टरला घातला 3 लाखांचा गंडा; अश्लील मेसेज अन् अटकेची भीती दाखवून लुटले
'विश्वास नांगरे पाटलांचा पीए बोलतोय' म्हणत पुण्यातील महिला डॉक्टरला घातला 3 लाखांचा गंडा; अश्लील मेसेज अन् अटकेची भीती दाखवून लुटले
Pune Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन; गोव्यातून दुचाकीवर पुण्यात आले अन्...., पोलिसांनी सापळा रचून चौघांना केलं अटक, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन; गोव्यातून दुचाकीवर पुण्यात आले अन्...., पोलिसांनी सापळा रचून चौघांना केलं अटक, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Team India : टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
टीम इंडियानं उडवला नेपाळचा धुव्वा, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, भारताचा 306 धावांनी विजय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Embed widget