Pune Accident : पुणे जिल्ह्यात अपघाताची (Pune Accident News) मालिका सुरुच आहे. (Pune district) शेतमजुरीची काम करुन पारनेरला घराकडे निघालेल्या शेतमजुरांना पिकअप जीपने चिरडल्याची घटना घडली आहे.  नगर कल्याण महामार्गावर लवणवाडी येथे हा अपघात झाला आहे. या घटनेत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यात दोन मुली, दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. 


सगळे शेतमजुर शेतीची सगळी कामं आटपून पारनेरला निघाले होते.  त्यावेळी रात्रीच्या सुमारास अंधारात पिकअप जीपने एक दोन नाही तर आठ जणांना चिरडलं. या अपघातामुळे काही काळ परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. सगळ्या जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. मात्र याच उपचारादरम्यान चौघांना जीव गमवावा लागला. या अपघातात झालेल्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


आपघाताची माहिती मिळताच पोलीस अपघात स्थळी दाखल झाले. त्यांनी रुग्णांना जवळच्या रुग्णालयात हलवलं. त्यानंतर त्यांनी अपघात स्थळाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत, शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. गाडी चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गाडी चालकाची कसून चौकशी करण्यात येणार आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात काही प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शेतमजुरांचा नाहक जीव गेल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.


अपघाताचं सत्र थांबेना


पुणे जिल्ह्यात अपघाताच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. रोज अपघाताच्या घटना समोर येत आहेत. त्यात अनेकांचे नाहक जीव जात आहेत. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र अपघाताच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी भोर परिसरात एका बसने पेट घेतला होता. थोड्या प्रमाणात या आगीची चाहूल लागताच चालकाने सर्व प्रवाशांना बाहेर काढलं होतं. त्यानंतर बसमध्ये अचानक भडका उडाला होता. या चालकांच्या प्रसंगावधानामुळे आतापर्यंत अनेकांचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे सगळ्यांकडून चालकांचं कौतुक करण्यात येतं. मात्र अपघात कधी थांबतील आणि नागरिक सुरक्षित प्रवास कधी करु शकतील, असा प्रश्न अनुत्तरीतच आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


 वाहनांचा वेग जीवघेणा! भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू; पुणे स्टेशन परिसरातील घटना