Pune Accident News: मावळमधील कुंडमळ्यात मस्ती करताना वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला आहे. वैभव देसाई असं या तरुणाचं नाव आहे. दोन दिवसांपूर्वी वैभव देसाई हा तरुण कुंडमळ्यात वर्षाविहाराचा आनंद घेत होता. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो वाहून गेला. त्याचा शोध मावळ वन्यजीव रक्षकच पथक घेत होत. अखेर त्यांच्या मेहनतीला यश आलं आहे. आज अखेर त्या तरुणाचा कुंडमळ्यात मृतदेह आढळला आहे.


गेल्या आठवड्यापासून मावळ परिसरात पाऊस सुरू आहे. इंद्रायणी नदीसह धबधबे वाहू लागले आहेत. हेच दृश्य बघण्यासाठी अनेक तरुण तरुणी कुंडमळा परिसरात येतात. जीवनाची परवा न करता कुंडमळ्यातील पाण्याच्या प्रवाहात जाऊन भलताच धाडस करतात. फोटोसाठी वेगवेगळ्या धोक्याच्या ठिकाणी जातात. त्यामुळे अशा घटना घडतात. 


नेमकं काय झालं होतं?
पुण्याच्या मावळमध्ये पाण्याच्या प्रवाहाशी खेळणं एका तरुणाला महागात पडलं. कुंडमळा येथे हा तरुण मित्रासोबत पाण्यात घुसला होता. त्यावेळी नको ते धाडस तो करत होता.वाहून जाण्यापूर्वी  तो करत असलेली मस्ती कॅमेऱ्यात ही कैद झाली होती. त्यानंतर काही वेळातच तो वाहून गेला. वैभव देसाई सध्या पिंपरी चिंचवड मध्ये राहणारा आहे. काल आकुर्डी येथील मित्रासोबत तो वर्षाविहाराचा आनंद घ्यायला आला होता. तेंव्हा ही घटना घडली होती.


नागरीकांच्या अति उत्साहाने अपघात
पुण्याच्या आजूबाजूचा निसर्ग सौंदर्य अनुभवायला अनेक नागरीक गर्दी करतात. अनेक नागरीकांना फोटो आणि सेल्फीचा मोह आवरत नाही. अति उत्साह दाखवतात. यामुळे गडकिल्ले आणि धोकादायक ठिकाणांवरील अपघातांचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. अनेक लहान मोठ्या धबधब्यामध्ये आतपर्यंत अनेकजण वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहे. त्याचबरोबर अनेकांनी जीव गमावला आहे. तरी देखील नागरीक खबरदारी घेताना दिसत नाही. धोकादायक ठिकाणी किंवा गडकिल्ल्यांवर जाताना योग्य काळजी घ्या. खबरदारी बाळगा, असं आवाहन प्रशासनाकडून कायम केलं जातं. त्याच्याकडून योग्य योजनादेखील आखली जाते मात्र नागरीकांच्या हलगर्जीपणामुळे अपघाताचं सत्र सुरुच असल्याचं चित्र आहे.