एक्स्प्लोर

Pune Accident : पुण्यात शिवशाही बस आणि कंटेरचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

Pune Accident : पुण्यात शिवशाही बस आणि कंटेरचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर कंटेनर चालक, वाहकासह चार प्रवासी जखमी झाले आहेत.

Pune Accident : पुण्यात (Pune) एसटी महामंडळाच्या शिवशाही बस (Shivshahi Bus) आणि कंटेरचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर चालक, वाहक आणि सहा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना प्राथमिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संजय एकनाथ भायदे (रा.मुरुड, वय 52 वर्षे) असं मृत प्रवाशाचं नाव आहे. हा अपघात एवढा भीषण होता की धडकेत कंटेनर आणि शिवशाही बसच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला.

पुणे-सासवड रस्त्यावर असलेल्या उरळी देवाची गावालगत रविवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. इथून जवळ असलेल्या गोडाऊनमधून निघालेला कंटेनर सासवडहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या पंढरपूर-पुणे एसटीच्या आडवा आला. या अपघातात चालक, वाहक आणि त्यामधील प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली.

कसा झाला अपघात?
शिवशाही बस पंढरपूरहून प्रवाशांना घेऊन पुण्याच्या दिशेने जात होती. ही बस पुणे-सासवड रस्त्यावर आली असताना उरळी देवाची फाट्याजवळ असलेल्या गोदामातून निघालेला कंटेनर शिवशाही बसच्या समोर आला आणि जोरदार धडक झाली. अपघातात बस आणि कंटेनरच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. ज्यामुळे एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर चालक, वाहत आणि प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं.

अपघातानंतर वाहतूक कोंडी
अपघातानंतर इथे वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त शिवशाही बस आणि कंटनेरला हटवण्यात आलं. परंतु  या दरम्यान अपघातामुळे उरुळी देवाची फाट्याजवळ वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर अपघातग्रस्त बस हटवल्यानंतर या मार्गावरची वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

VIDEO : Pune - Saswad रस्त्यावर Shivshahi Bus कंटेनरचा अपघात, चालक आणि प्रवासी गंभीर

बुलढाण्यात एसटीच्या कापलेल्या पत्र्यामुळे दोघांचे हात तुटले, एकाचा हात मोडला 
बुलढाण्यात एसटीच्या निघालेल्या पत्र्यामुळे दोघांनी हात गमावले. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पिंपळगाव देवी मार्गावर तीन दिवसांपूर्वी एक विचित्र अपघात झाला होता. एसटी बसचा कापलेला पत्रा लागून दोघाचे हात अक्षरश: तुटले तर एकाचा हात मोडला आहे. मलकापू पिंपळगाव देवी मार्गावर व्यायाम करणाऱ्या करणाऱ्या तरुणाचा हात या पत्र्यामुळे तुटला. तर पुढे शेतात जाणाऱ्या एका शेतकऱ्याला एसटीन धडक दिली, ज्यात पत्रामुळे त्याचा हात तुटला. याशिवाय एसटीने एका दुचाकीस्वारालाही धडक दिली होती, ज्यात त्याचा हात मोडला. या प्रकरणी धामणगाव वडे पोलिसांनी एसटी चालकाला अटक करुन त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah in Pune: अमित शाहांचा दौरा निर्धोक पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांची जोरदार फिल्डिंग, काँग्रेस तरुण कार्यकर्त्यांची धरपकड, नेमकं काय घडलं?
अमित शाहांचा दौरा निर्धोक पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांची जोरदार फिल्डिंग, काँग्रेस तरुण कार्यकर्त्यांची धरपकड, नेमकं काय घडलं?
Amit Shah Pune Visit: अमित शाहांनी रात्री पुण्यात पाऊल ठेवताच पोलिसांची वेगवान कारवाई, 'त्या' भीतीमुळे युवक काँग्रेसच्या चार तरुण पदाधिकाऱ्यांना उचललं
अमित शाहांनी रात्री पुण्यात पाऊल ठेवताच पोलिसांची वेगवान कारवाई, 'त्या' भीतीमुळे युवक काँग्रेसच्या चार तरुण पदाधिकाऱ्यांना उचललं
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिलेलं नाही, पुढची निवडणूक ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील, जयकुमार गोरेंचा खोचक टोला
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिलेलं नाही, पुढची निवडणूक ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील, जयकुमार गोरेंचा खोचक टोला
पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजमध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचं रॅगिंग, कंटाळून होस्टेल सोडलं, 14 दिवसांपासून संपर्कच नाही!
पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजमध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचं रॅगिंग, कंटाळून होस्टेल सोडलं, 14 दिवसांपासून संपर्कच नाही!

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Congress Bhai Jagtap: दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Raj Thackeray and Chandrakant Patil: मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Embed widget