Pune Latest Crime News : पुणे महानगरपालिकेच्या नव्याने स्थापन झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी सोळा लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामधील दहा लाख रुपये स्वीकारताना डीनला रंगेहात पकडण्यात आले. आज सायंकाळी पुणे महानगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात ही कारवाई करण्यात आली आहे. आशिष श्रीनाथ बनगिनवार, (वय 54 वर्ष, डीन (वर्ग-1) असे रंगेहात पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पुणे, शिक्षणाच्या महेर घरात पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनला तबल १० लाख रुपयांची लाच घेताना पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यांनी 16 लाखांची मागणी केली होती. त्यातील पहिला हप्ता घेताना पकडण्यात आले. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
आशिष श्रीनाथ बनगिनवार (वय 54) असे पकडण्यात आलेल्या डीनचे नाव आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आले आहे. याबाबत पुण्यातील 49 वर्षीय डॉक्टर यांनी तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आशिष श्रीनाथ बनगिनवार हे महापालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी मेडीकल कॉलेजचे डीन आहेत तर हे पुण्यातील एक मोठे डॉक्टर आहेत. दरम्यान तक्रारदार यांचा मुलगा नीट परिक्षा 2023 मध्ये उत्तीर्ण झाला होता. त्याची एमबीबीएसच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याच्या पहिला कॅप राऊंडमध्ये पुणे महानगरपालिका वैद्यकिय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालय येथे इन्स्टिट्यूशनल कोटा मधून निवड झाली होती.
या निवड यादीचे आधारे तक्रारदार हे लोकसेवक आशिष बनगिनवार यांना मुलाचे एम.बी.बी.एस. च्या महाविद्यालयात प्रवेश प्रक्रीयेसाठी भेटले होते. दरम्यान नियमानुसार दरवर्षाची प्रवेश फिस ही २२ लाख ५० हजार रुपये असते. मात्र डीन डॉ. आशिष यांनी या व्यतिरिक्त प्रवेशासाठी त्यांच्याकडे अधिकचे १६ लाख रुपयांची लाच मागणी केली होती. याबाबत यातील तक्रारदार यांनी पुणे एसीबीकडे तक्रारदार दिली होती. तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीची पडताळणी केली. त्यात लोकसेवक आशिष बनगिनवार यांनी तक्रारदार यांच्या मुलाचे एम.बी.बी.एस.च्या प्रवेशासाठी तडजोडीअंती 16 लाख रुपये लाच रक्कम मागणी केल्याचे समोर आले. त्यानुसार आज येथील कार्यालयात पहिला हप्ता म्हणून १० लाख रुपये स्विकारल्यावर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.