एक्स्प्लोर

शेकडो गाड्यांचा ताफा, फटाके फोडून मिरवणूक; जेलमधून सुटल्यानंतर कुख्यात गुंड गजानन मारणेचं शक्तिप्रदर्शन

2014 साली पुण्यात झालेल्या दोन हत्यांच्या शिक्षा भोगत असलेल्या गजानन मारणेची सोमवारी सुटका करण्यात आली. त्यांनतर मारणेच्या शेकडो समर्थकांनी पुण्याला येताना एक्स्प्रेसवेवर हैदोस घातला.

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेची तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी शक्ति प्रदर्शन करत तळोजा ते पुण्यापर्यंत काढलेल्या मिरवणुकीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एक्सप्रेसवेला शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह जंगी मिरवणूक काढण्याची हिंमत या गुंडांमध्ये येतेच कुठून आणि पुण्यातील मध्यवर्ती भागात दिवसा ढवळ्या झालेल्या हत्येचे पुरावे पोलीस न्यायालयात सादर का करू शकले नाहीत. पोलिसांच्या आशिर्वादाशिवाय हे होणं शक्य नाही अशीच सर्वसामान्यांची या बाबतीतील भावना बनली आहे.

2014 साली पुण्यात झालेल्या दोन हत्यांच्या शिक्षा भोगत असलेल्या गजानन मारणेची सोमवारी सुटका करण्यात आली. त्यांनतर मारणेच्या शेकडो समर्थकांनी पुण्याला येताना एक्स्प्रेसवेवर हैदोस घातला. ओपन कारमध्ये उभ्या असलेल्या गजानन मारणेच्या मागे-पुढे शेकडो गाड्यांचा ताफा होता. एवढंच नाही तर फटाके फोडत, आरडा-ओरडा करत आणि ड्रोनच्या साहाय्याने शुटिंग करत त्याच्या समर्थकांचा धिंगाणा चालू होता. आश्चर्याची बाब म्हणजे, त्यांना त्यावेळी कोणीही अडवलं नाही. हा ताफा पुढे निघून गेल्यावर पोलिसांनी एक्सप्रेसवेचे नियम मोडल्याबद्दल मारणे आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा नोंद केलाय. त्याचबरोबर अवैधरित्या उडवले जाणारे ड्रोन कॅमेरेही जप्त केले आहेत.

कोण आहे गजानन मारणे?

मागील अनेक दशकांपासून गजानन मारणे हे नाव पुण्यातील गुन्हेगारी विश्वाच्या केंद्रस्थानी आहे. हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, बेकायदा शस्त्रं बाळगणं असं अनेक गुन्हे मारणेवर नोंद आहेत. 2014 साली विरोधी टोळीतील पप्पू गावडे आणि अमोल बधे यांच्या हत्येच्या आरोपाखाली मारणेला त्याच्या साथीदारांसह अटक करण्यात आली होती. त्यातील अमोल बधेचा खून तर पुण्यातील नवी पेठेत पाठलाग करून धारदार शस्त्रांच्या साहाय्याने करण्यात आला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या थरारक घटनेने पुण्यात खळबळ उडाली होती.

गजानन मारणेच्या स्वागतासाठी जमलेल्या त्याच्या समर्थकांमध्ये तरुणाईत नुकत्याच प्रवेश केलेल्या युवकांचं प्रमाण अधिक आहे. गुन्हेगार आणि गुन्हेगारीचं अशाप्रकारे होणारं उदात्तीकरण या तरुणांची पावलं गुन्हेगारी विश्वाकडं वळण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे या उद्दात्तीकरणाला जर वेळीच आळा घातला नाही, तर त्यातून असे अनेक गजानन मारणे निर्माण होण्याची भिती आहे. आणि तसं झाल्यास त्याला जबाबदार पोलिसच असणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Police: बदली न झाल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा संताप; थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या शासकीय निवासस्थानी कार घुसवायचा प्रयत्न, बंगल्याच्या मेन गेटला कारनं ठोकलं
बदली न झाल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा संताप; थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या शासकीय निवासस्थानी कार घुसवायचा प्रयत्न, बंगल्याच्या मेन गेटला कारनं ठोकलं
NCP Internal unrest: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी, देवगिरी बंगल्यावरच्या रात्रीच्या बैठकीनंतर पुन्हा कोअर कमिटी जमणार, नेमकं काय सुरु?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी, देवगिरी बंगल्यावरच्या रात्रीच्या बैठकीनंतर पुन्हा कोअर कमिटी जमणार, नेमकं काय सुरु?
Payal Pawar Zhambre Death Case Pune: आमची मुलगी खाल्ली...गिळली; पायलचं माहेर धाय मोकलून रडलं, 7 वर्षे काय घडलं?, सगळं सांगितलं!
आमची मुलगी खाल्ली...गिळली; पायलचं माहेर धाय मोकलून रडलं, 7 वर्षे काय घडलं?, सगळं सांगितलं!
Rohit Pawar on Parth Pawar: पार्थ पवार-जय पवारांमध्ये फूट पाडण्याचा डाव, अजितदादा गटातील 'त्या' नेत्यांची भाजपला मदत; रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
पार्थ पवार-जय पवारांमध्ये फूट पाडण्याचा डाव, अजितदादा गटातील 'त्या' नेत्यांची भाजपला मदत; रोहित पवारांचा खळबळजनक आरोप

व्हिडीओ

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police: बदली न झाल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा संताप; थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या शासकीय निवासस्थानी कार घुसवायचा प्रयत्न, बंगल्याच्या मेन गेटला कारनं ठोकलं
बदली न झाल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा संताप; थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या शासकीय निवासस्थानी कार घुसवायचा प्रयत्न, बंगल्याच्या मेन गेटला कारनं ठोकलं
US Midterm Elections Result 2026 Live Updates: अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धडाधड धक्के; जॉर्जिया आणि व्हर्जिनियामध्ये डेमोक्रॅट्सचा विजय, निवडणुकांचे निकाल Live
अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धडाधड धक्के; जॉर्जिया आणि व्हर्जिनियामध्ये डेमोक्रॅट्सचा विजय, निवडणुकांचे निकाल Live
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; ट्रम्प यांचा पक्ष हरला तर भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; ट्रम्प यांचा पक्ष हरला तर भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
Gokul Election: गोकुळवरून कोल्हापुरात लेटर वॉर; सतेज पाटलांच्या पत्राला महायुतीचं धडाकेबाज प्रत्युत्तर, म्हणाले
गोकुळवरून कोल्हापुरात लेटर वॉर; सतेज पाटलांच्या पत्राला महायुतीचं धडाकेबाज प्रत्युत्तर, म्हणाले "तुमचे दोन संचालक आम्हाला द्या अन्..."
Raju Shetty Agitation: तुम्ही आमची दिवाळी होऊ दिली नाही, आम्ही तुमची दिवाळी होऊ देणार नाही, राजू शेट्टींनी पुणे-बंगळुरु महामार्ग रोखून धरला, 22 तासांपासून वाहतूक ठप्प
तुम्ही आमची दिवाळी होऊ दिली नाही, आम्ही तुमची दिवाळी होऊ देणार नाही, राजू शेट्टींनी पुणे-बंगळुरु महामार्ग रोखून धरला, 22 तासांपासून वाहतूक ठप्प
Dia Mirza Diwali Video: हायकोर्टाच्या तंबीनंतरही BMC ढिम्म बसून राहिली, दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा अपलोड केलाच नाही, आता स्थायी समितीत राजकारण तापणार?
हायकोर्टाच्या तंबीनंतरही BMC ढिम्म बसून राहिली, दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा अपलोड केलाच नाही, आता स्थायी समितीत राजकारण तापणार?
NCP Internal unrest: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी, देवगिरी बंगल्यावरच्या रात्रीच्या बैठकीनंतर पुन्हा कोअर कमिटी जमणार, नेमकं काय सुरु?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी, देवगिरी बंगल्यावरच्या रात्रीच्या बैठकीनंतर पुन्हा कोअर कमिटी जमणार, नेमकं काय सुरु?
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
Embed widget