पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिलेला 'तो' अजब आदेश अखेर मागे घेतला आहे. आता सुधारित आदेश काढून खाजगी रुग्णालयांनी ऑक्सिजनची बचत करण्यासाठी नियमावली दिली आहे. हा नवा आदेश पिंपरी चिंचवड खाजगी रुग्णालय संघटनेलाही मान्य आहे. खाजगी रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा उपलब्ध असेल तरच रुग्ण दाखल करून घ्यावे, असा अजब आदेश रुग्णांच्या जीवावर कसा उठणारा आहे, हे काल एबीपी माझाने समोर आणले होते. त्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी आपला आदेश मागे घेतला आहे. 


सध्या ऑक्सिजनचा तुटवडा आहे, त्यात सरकारी रुग्णालये फुल आहेत. म्हणून रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याला पसंती देत आहेत. अशात खाजगी रुग्णालयांना ऑक्सिजन कसा पुरवता येईल यावर तोडगा काढण्याऐवजी आयुक्तांनी ऑक्सिजन नसेल तर रुग्ण दाखल करून घेऊ नका, असा अजब आदेश काढला. एबीपी माझाने ही बातमी प्रसारित केल्यानंतर आयुक्त राजेश पाटलांनी घुमजाव केला आणि सुधारित आदेश काढला. यात खाजगी रुग्णालयांनी उपचार करताना ऑक्सिजनची बचत करण्यासाठी नियमावली आखली. हा नवा आदेश खाजगी रुग्णालयांना देखील मान्य आहे. एबीपी माझाच्या बातमीमुळे रुग्ण आणि रुग्णालयांमधील संभ्रमावस्था दूर झाली. त्यामुळे खाजगी रुग्णालय संघटनेने आभार मानले आहेत.


पिंपरी चिंचवड खाजगी रुग्णालय संघटनेचे अध्यक्ष गणेश भोईर यांना प्राप्त हा अद्यादेश प्राप्त झाला होता. आधीच सरकारी रुग्णालयं रुग्णांनी तुडुंब वाहतायेत. त्यात हा असा आदेश काढला असेल तर ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांना पालिका आयुक्त राजेश पाटलांनी वाऱ्यावर सोडले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत होता. याबाबत महापालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांना विचारलं असता उडवाउडवीची उत्तर दिली जात होती. 


महत्वाच्या बातम्या :