पुणे : पुणे जिल्ह्यात बिबट्याची दहशत (Leopard Attack ) सर्वश्रुत आहेच. पण शिकार करताना त्याच बिबट्याची चाल ही त्याच्या स्वभावाच्या विपरीत असते. शिकार करताना तो अगदी दबक्या पावलांनीच येतो. पुण्याच्या मावळमध्ये शिकारीसाठी आलेल्या बिबट्याची हिच चाल सीसीटीव्हीत कैद झाली आहे. शनिवारच्या मध्यरात्री सांगवडे येथील विनायक जगतापांच्या अंगणात बिबट्याने दहशत माजवली आहे. जगतापांचं पाळीव कुत्रं घराबाहेरच रक्षणासाठी बसलं होतं. त्यावेळी दबक्या पावलात बिबट्या तिथं पोहचला आणि काही कळायच्या आतच त्याने कुत्र्याची शिकार केली. या परिसरात बिबट्याचा वावर वाढलाय, हे या दृश्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. सोबतच स्थानिक नागरिक दहशतीत आहेत, ते ही यातून स्पष्ट होतं आहे. 


चाकणमध्येही केला होता बिबट्याने शिरकाव


मागील महिन्यात पुण्यातील चाकण एमआयडीसीमध्ये पहाटे बिबट्या आढळला होता. हा बिबट्या मर्सडिज बेन्ज या आंतरराष्ट्रीय कंपनीत घुसल्याचं कंपनीमधील एका चालकाच्या निदर्शनास आलं होतं. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन बिबट्या असल्याची खात्री करून घेतली. तसेच त्यांनी याबाबत वनविभागाला कळवलं होतं. जवळपास सात तासांच्या थरारानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं. कंपनीच्या बॉडी शॉप सेक्शनमधील कामगारांना खबरदारी म्हणून बाहेर काढण्यात आलं होतं. चाकण एमआयडीसीत अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या असल्याने या एमआयडीसीची आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळी ओळख आहे. याच एमआयडीसीमधील मर्सडिज बेन्ज या आंतरराष्ट्रीय कंपनीत आज बिबट्याने शिरकाव केला होता. यामुळं एमआयडीसीसह आसपासच्या परिसरात खळबळ उडाली होती. कंपनी साधारण शंभर एकरमध्ये विस्तारल्यानं बिबट्याला जेरबंद करण्याचं मोठं आव्हान वनविभागासमोर होतं. मदतीला पिंपरी चिंचवड पोलीस ही दाखल झाले होते.


नागरिक धास्तावले...


मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात विविध भागांमध्ये बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. त्यामुळे अनेक नागरिक धास्तावले आहेत. पाण्याच्या शोधात हे बिबटे वस्तीत शिरत असावेत असा अंदाज आहे. मात्र या बिबट्यांच्या अशा वावरामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. सध्या बिबट्याचा धडकी भरवणारा हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होत आहे. यात बिबट्या थेट  तीन कुत्र्यांवर हल्ला केलेला दिसत आहे.  त्यातील एकता कुत्र्याची शिकार केल्याचंदेखील सीसीटीव्ही व्हिडीओत दिसत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या :


Sasoon hospital drug racket : ललित पाटील कसा पळाला?, डॉक्टरांना लक्ष्मीदर्शन घडतंय का? ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूर नेमकं काय म्हणाले?