पुणे आपल्या कारनाम्यांनी चर्चेत आलेली वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरांना  (IAS Pooja Khedkar)  एफआयआर दाखल करण्याचा निर्णय UPSC ने घेतला आहे, तसंच डॅा. पूजा खेडकर यांचं आयएएस केडर रद्द करणे आणि सर्व परीक्षांसाठी बाद करण्यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ही  माहिती केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात  यूपीएससीने प्रसिद्धीपत्रक जारी करून दिली आहे.  


पूजा खेडकर यांनी यूपीएससी परीक्षा  देण्यासाठ जी प्रमाणपत्र सादर केली आहेत, ती बोगस असल्याचे एव्हाना सिद्ध झाली आहे, त्यानंतर हा यूपीएससीने हा निर्णय घेतला आहे. पूजा खेडकर 2018 पर्यंत  सामान्या विद्यार्थिनी म्हणून परीक्षा देत होत्या. मात्र 2018 नंतर त्यांनी नाव बदलले, खोटी ओळख निर्माण केली, दिव्यांग असल्याची खोटी कागदपत्रे सादर केली. ही खोटी कागदपत्रे मिळवताना त्यांनी माहिती लपवली.  जेव्हा त्यांची वैदकीय चाचणी घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्या वैद्यकीय चाचणीला उपस्थित राहिल्या नाहीत. त्यानंतर अनेक  गंभीर प्रकार लक्षात आले आणि त्यानंतर युपीएससीने हे पाऊल उचललेले आहे.


कोणाकोणाची चौकशी होणार?


पूजा खेडकरांचे फक्त आयएएस पद्द रद्द करणे नाही तर आयएएस पद मिळवण्यासाठी जी कृत्ये केली आहेत  ती अतिशय गंभीर आहे किंवा गुन्ह्याच्या स्वरूपाची आहे हे लक्षात घेऊन त्यांच्यावर  गुन्हा दाखल करायचं ठरवले आहे.  मात्र प्रश्न हा आहे की फक्त या पूजा खेडकर यांच्यावरतीच कारवाई होणार का की त्यांना वरपासून खालपर्यंत ज्यांनी वेळोवेळी पाठिंबा दिला तिथेपर्यंत देखील चौकशी पोहोचणार त्यांच्यावर देखील कारवाई होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


पूजा खेडकरांवर कोणाचा वरदहस्त?


कारण पूजा खेडकरांची रँक   821 होती आणि या रँकला महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये त्यांना केडर मिळणे जवळपास अशक्य आहे. मात्र तरी देखील ते केडर मिळाले ते कोणाच्या वरदहस्तामुळे मिळाले? एवढच नाही तर केडर मिळाल्यानंतर   त्यांना त्यांचे होमटाऊन पुणे कोणाच्या प्रभावातून मिळाले? आणि सर्वात म्हणजे  मुळामध्ये त्यांच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र हव्या त्या स्वरूपामध्ये नसताना त्यांना आयएएस कोणाच्या प्रभावातून मिळाली?  या सगळ्या गोष्टींची चौकशी होणार का हे सगळे प्रश्न आहेत. या सगळ्यांची उत्तर देखील यंत्रणाला द्यायचेत यूपीएससीला द्यायची आहेत.   


 Pooja Khedkar : पूजा खेडकरांवर  एफआयआर दाखल करण्याचा UPSCचा निर्णय



     हे ही वाचा :


Pooja Khedkar : IAS पूजा खेडकर प्रकरणातील थर्मोव्हेरिटा कंपनी पालिकेकडून सील; हाच पत्ता वापरून मिळवलं अपंगत्वाचे प्रमाणपत्र