एक्स्प्लोर

Pune ACB Trap: पुण्यात ACB कडून मोठी कारवाई; पोलीस उपनिरिक्षकाला लाच घेताना रंगेहात पकडले

पुण्यात लाचलुचपत विभागाने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षकाला रंगेहात पकडले आहे. 50 हजार रकमेची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

Pune ACB Trap: पुण्यात लाचलुचपत विभागाने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षकाला रंगेहात पकडले आहे. 50 हजार रकमेची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रार केलेल्या अर्जात मदत करतो आणि अडकलेले पैसे काढून देतो, असं सांगून 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. सागर पोमण असं या 35 वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. पोलीसांकडूनच अशा प्रकारच्या लाचेची मागणी झाल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे.

तक्रारदाराचे आर्थिक व्यवहारात पैसे अडकले होते. त्यामुळे तक्रारदार त्रस्त होता. त्याचाच फायदा घेत आर्थिक व्यवहारांमध्ये अडकलेले पैसे परत मिळवून देतो सांगत लाचेची मागणी केली होती. तक्रारदार हे व्यवसायिक आहेत. त्यांचे 20 लाख मिळवून देण्यासाठी  50 हजार रुपयांची मागणी केली होती.  मात्र तक्रारदाराने लगेच  लाचलुचपत विभागा तक्रार केली त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर लाचलुचपच विभागाने कारवाईला सुरुवात केली.

कोरेगाव पार्क परिसरातील एका हॉटेलमध्ये आणून देण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे तक्रारदाराने 50 हजार पोलीस उपनिरिक्षकाला आणून दिले आणि त्यांनी स्वीकारले. लाचलुचपत विभागाने सापळा रचला. साध्या वेशात जात लाचलुचपत विभागातील अधिकाऱ्यांनी पोलीस निरिक्षकाला रंगेहात पकडले.

1 कोटी रुपयांची अपसंपदा जमवल्याप्रकरणी पुण्यातील मनपा उपायुक्तांवर गुन्हा दाखल

पुणे महापालिकेतील उपायुक्त विजय लांडगे आणि त्यांची पत्नी शुभेच्छा लांडगे या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गैरमार्गाने मालमत्ता कमावल्याबद्दल अटक केली होती. तब्बल 1 कोटी रुपयांची अवैध अपसंपदा जमवल्याप्रकरणी त्यांंच्यावर कारवाई करण्यात आली होती. ज्ञात उत्पन्नापेक्षा लांडगे पती- पत्नींकडे 31.59 टक्के जास्त मालमत्ता आढळून आली होती. विजय लांडगे हे पुणे महापालिकेतील आकाशचिन्ह विभागात उपायुक्त होते. या पदाचा दुरुपयोग करून त्यांनी ही बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच म्हणणं होतं. लांडगेंकडे एक कोटी दोन लाख साठ हजार रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली होती. मोठा अधिकारी गाळाला लागल्याने खळबळ उडाली होती.

 

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar : महाराष्ट्र हळहळला, डोळे पाणावले! नाना पाटेकर अनंतात विलीन, डोणजे गावात भावपूर्ण वातावरणात 'नटसम्राटा'ला शेवटचा निरोप
महाराष्ट्र हळहळला, डोळे पाणावले! नाना पाटेकर अनंतात विलीन, डोणजे गावात भावपूर्ण वातावरणात 'नटसम्राटा'ला शेवटचा निरोप
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
Pune MPSC Student Protest: तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget