एक्स्प्लोर

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसकेंच्या आणखी 25 मालमत्ता जप्त

डीएसकेंच्या पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात असलेल्या 350 कोटींच्या आणखी 25 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

पुणे : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा कारागृहात असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींना मोठा धक्का बसला आहे. डीएसकेंच्या पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात असलेल्या 350 कोटींच्या आणखी 25 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी याबाबत माहिती दिली आहे. जप्त केलेल्या सर्व मालमत्तांचा तपशील उपजिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. डी एस कुलकर्णी यांच्यासह 8 जण गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत आहेत. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. डीएसकेंनी 33 हजार गुंतवणूकदारांची 2 हजार 91 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार आतापर्यंत डीएसकेंच्या 459 मालमता जप्त करण्यात आल्या आहेत. या मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रियाही सुरु आहे. नव्याने जप्त केलेल्या 25 मालमत्तांपैकी पुण्यातील धायरीत 12, पिरंगुटमध्ये 5, बाणेरमध्ये 3, बावधन, बालेवाडी येथे प्रत्येकी दोन अशा एकूण 25 मालमत्तांचा समावेश आहे. यामध्ये साधारण 35 एकर जमिनीचाही समावेश आहे. बाजारभावानुसार या जमिनीची किंमत 200 ते 300 कोटी असण्याची शक्यता आहे. या सर्व मालमत्तांचा तपशील उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. काय आहे प्रकरण? डीएसकेंवर गुंतवणूकदारांची फसवणूक करत तब्बल 2 हजार 43 कोटींच्या घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला. याप्रकरणी कुलकर्णी दाम्पत्यावर 36 हजार 875 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं. डीएसके आणि हेमंती यांना 17 फेब्रुवारीला अटक झाली होती. आधी दोघंही पोलिस कोठडीमधे होते, त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यामुळे दोघांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती यांनी केलेल्या पैशांच्या गैरव्यवहारात आणखी तिघांचाही समावेश असल्याचं उघड झालं होतं. डीएसकेंच्या भावाचा जावई केदार वांजपे, त्याची पत्नी (डीएसकेंची पुतणी) सई वांजपे आणि डीएसके कंपनीचा सीईओ धनंजय पाचपोर यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. केदार वांजपे हा डीएसकेंच्या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक होता. ड्रीम सिटीचं अधिग्रहण करण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates: पाऊस अचानक का थांबला, पुन्हा कधी कोसळणार?; भारतीय हवामान विभागाने सांगितली A टू Z माहिती
पाऊस अचानक का थांबला, पुन्हा कधी कोसळणार?; भारतीय हवामान विभागाने सांगितली A टू Z माहिती
Pune Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनाग्रस्त इमारत 'कशी' होती? फोटो आला समोर; अगदी कचऱ्याच्या ढिगाऱ्याला लागूनच उभारली होती देखणी वास्तू
मोशी दुर्घटनाग्रस्त इमारत 'कशी' होती? फोटो आला समोर; अगदी कचऱ्याच्या ढिगाऱ्याला लागूनच उभारली होती देखणी वास्तू
Jejuri Warkari Accident: जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघाताला पोलीस प्रशासनाचा नियोजन शून्य कारभारच जबाबदार; वारकरी साहित्य परिषदेच्या अध्यक्षांचा गंभीर आरोप
जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघाताला पोलीस प्रशासनाचा नियोजन शून्य कारभारच जबाबदार; वारकरी साहित्य परिषदेच्या अध्यक्षांचा गंभीर आरोप
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Warkari Accident: पाठीमागून मोठा ट्रक आला, सगळ्यांना धडाधड पाडत अंगावरुन गेला; माऊलींच्या पालखीत काय घडलं?, प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
पाठीमागून मोठा ट्रक आला, सगळ्यांना धडाधड पाडत अंगावरुन गेला; माऊलींच्या पालखीत काय घडलं?, प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
Beed Crime : IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांना पैसे शासनाला परत करावे लागणार, आदिती तटकरेंकडून नवी अपडेट
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांना पैसे शासनाला परत करावे लागणार, आदिती तटकरेंकडून नवी अपडेट
बारमध्ये पार्टी सुरु असतानाच आग लागल्याने 27 जणांचा कोळसा, 60 जण होरपळले; जीव वाचवण्यासाठी टाॅयलेटमध्ये लपले
बारमध्ये पार्टी सुरु असतानाच आग लागल्याने 27 जणांचा कोळसा, 60 जण होरपळले; जीव वाचवण्यासाठी टाॅयलेटमध्ये लपले
युद्ध पुन्हा पेटलं असतानाच इराणमध्ये अशा सिक्रेट रशियन विमानाची एन्ट्री, अमेरिकेसह डोनाल्ड ट्रम्पची सुद्धा पाचावर धारण बसली पाहिजे! या विमानाची माहिती कधीच उघड केली जात नाही कारण..
युद्ध पुन्हा पेटलं असतानाच इराणमध्ये अशा सिक्रेट रशियन विमानाची एन्ट्री, अमेरिकेसह डोनाल्ड ट्रम्पची सुद्धा पाचावर धारण बसली पाहिजे! या विमानाची माहिती कधीच उघड केली जात नाही कारण..
धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय
धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय
Mumbai Crime News: 'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
Embed widget