एक्स्प्लोर

PMPML कामगारांचा ओव्हरटाईम बंद, तुकाराम मुंढेंचा आणखी एक निर्णय

पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थात PMPML चे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी सूत्र हाती घेताच धडाकेबाज कामगिरी सुरु केली आहे. गेल्या काही दिवसात त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. असाच एक महत्वाचा निर्णय आज (बुधवार) मुंढेंनी घेतला आहे. पीएमपीएमएलच्या कामगारांना यापुढे ओव्हरटाईम करु नये असा आदेश मुंढेंनी काढला आहे. जरी कामगारांनी ओव्हरटाईम केला तरीही त्याचा पगार मात्र त्यांना मिळणार नाही. असंही मुंढेंनी स्पष्ट केलं आहे. या निर्णयामुळे आता पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या ओव्हरटाईमला फुलस्टाप मिळणार आहे. पीएमपीएमएलचे  एकूण 9700 कर्मचारी असून या सर्वांना हा नियम लागू करण्यात आला आहे. दरम्यान, पीएमपीएमएलला काही मार्गांवर उत्पन्न मिळत नसल्याचं कारण देऊन कोणतीही पूर्वसूचना न देता 27 मार्गांवरील 38 बस बंद केल्याचा आरोप पीएमपीएल प्रवासी मंचने काल केला. पीएमपीएमएलची बससेवा नफ्यासाठी नसून, प्रवाशांच्या सेवेसाठी असल्याने तुकाराम मुंढे यांनी प्रवासी केंद्रीत विचार करावा, अशी मागणीही प्रवासी मंचातर्फे करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांनी इतर चांगले निर्णय घेतले त्याचं स्वागत करतो, पण चालू मार्ग बंद करू नये, अशी मागणी प्रवासी मंचाने केली आहे. सूत्रं स्वीकारताच पहिला झटका तुकाराम मुंढे यांनी 29 मार्चला PMPML चा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी कामचुकार कामगारांवर कारवाई सुरु केली.  दोनच दिवसात म्हणजे 1 एप्रिलला त्यांनी पहिला झटका दिला. रात्री पुणे स्टेशन आणि कोथरुड डेपोमध्ये गाडयांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामावर असलेले 9 कर्मचारी झोपल्याचं भरारी पथकाला आढळून आलं. मात्र ही डुलकी या कर्मचाऱ्यांना महागात पडली. या 9 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिले. शहरात एकूण 13 डेपो असून रात्रीच्या वेळेत झोपणाऱ्या कर्माचाऱ्यांवर कारवाईचे आदेश तुकाराम मुंढे यांनी प्रशासनास दिले होते.  त्यासाठी त्यांनी भरारी पथकं नेमली आहेत. महापौरांना झटका महापालिकेतील विषय समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडणूक शुक्रवारी 7 एप्रिलला होती. त्यासाठी तुकाराम मुंढे यांची पीठासीन आधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या निवडणुकीसाठी महापौर, उपमहापौर, सर्व पक्षांचे गटनेते उपस्थित असतात. अशी महापालिकेची परंपरा आहे. तुकाराम मुंढे यांनी मात्र समीतीचे सदस्य असलेल्या नगरसेवकांशिवाय इतरांना उपस्थित राहण्यास मनाई केली. त्याला नगरसेवकांनी हरकत घेतली. त्यानंतर महापौर आणि गटनेत्यांना उपस्थित राहण्यास मुंढे यांनी परवानगी दिली. मात्र, या सर्वांना बाजूला एका कोपर्‍यात बसावं लागेल, असं मुंढे यांनी सांगितले. त्यामुळे महापालिकेत येऊनही महापौर मुक्ता टिळक यांनी या निवडणुकीला जायचं टाळलं.

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र हीच देवेंद्रजींची कर्मभूमी, ते इथं चांगल काम करतायेत, दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर अमृता फडणवीसांचं वक्तव्य 
महाराष्ट्र हीच देवेंद्रजींची कर्मभूमी, ते इथं चांगल काम करतायेत, दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर अमृता फडणवीसांचं वक्तव्य 
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द, पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे 100 टक्के, पालिका आयुक्तांची माहिती
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द, पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे 100 टक्के, पालिका आयुक्तांची माहिती
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार द्यावा, आमदार विक्रम काकडेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी
अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार द्यावा, आमदार विक्रम काकडेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Embed widget