Lok Sabha Election 2024: पंतप्रधान मोदींची जादू पुन्हा चालणार? ताज्या सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष समोर, भाजप, काँग्रेस आणि इतर पक्षांच्या पारड्यात किती जागा?

PM Modi Pune visit: पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रदान करण्यात येणार आहे.

abp majha web team Last Updated: 01 Aug 2023 05:44 PM
Nashik Bandhara : नाशिकच्या मोहपाडा येथील वनविभागाने बांधलेला बंधारा फुटला, शेतीपिकांचे नुकसान 

Nashik Bandhara : नाशिकच्या सुरगाणा (Surgana) तालुक्यातील मोहपाडा इथं वनविभागाने बांधलेला मातीचा बंधारा फुटला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. वनविभागाने मागील वर्षी या मातीच्या बंधाऱ्याचे काम केले होते. हे काम निकृष्ट झाल्याने बंधारा फुटला, त्यामुळं शेतकऱ्यांचं आणि रस्त्याचं नुकसान झालं आहे. वनविभागाने या बंधाऱ्याचं पुन्हा बांधकाम करण्याची आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागलीय. तसंच उंबरपाडा येथील रस्त्यावरील मोरी पूल पुरात वाहून गेल्याने मोठे खड्डे पडले. उंबरपाडा येथीलच भारत निर्माण योजनेची पाइपलाइनही पुरात वाहून गेली आहे.  


 

Lok Sabha Election 2024: पंतप्रधान मोदींची जादू पुन्हा चालणार? ताज्या सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष समोर, भाजप, काँग्रेस आणि इतर पक्षांच्या पारड्यात किती जागा?
Lok Sabha Election 2024: इंडिया टीव्ही-सीएनएक्स ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? Read More
 PM Modi Pune visit sharad pawar :    मोदींचे अंत:करणापासून अभिनंदन- शरद पवार

 PM Modi Pune visit sharad pawar :   टिळक पुरस्काराला आगळं वेगळं महत्त्व आहे. आज आपण आणि टिळक स्मारकाने पुरस्कारासाठी मोदीजींची निवड केली. या पुरस्कारांमध्ये इंदिरा गांधी, खान अब्दुल गफार खान, बाळासाहेब देवरस, शंकर दयाल शर्मा, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह अशा अनेक मान्यवरांची निवड झालेली आहे. या मान्यवरांच्या पंक्तीत आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश झाला, याचा सर्वांना आनंद झाला. म्हणून आमच्या सगळ्यांची वतीने त्यांची निवड झाली, त्यांना हा पुरस्कार देण्यात येतोय, त्यांचं अंत:करणापासून अभिनंदन करतो.


 
 PM Modi Pune visit sharad pawar :    मोदींचे अंत:करणापासून अभिनंदन-

 PM Modi Pune visit sharad pawar :   टिळक पुरस्काराला आगळं वेगळं महत्त्व आहे. आज आपण आणि टिळक स्मारकाने पुरस्कारासाठी मोदीजींची निवड केली. या पुरस्कारांमध्ये इंदिरा गांधी, खान अब्दुल गफार खान, बाळासाहेब देवरस, शंकर दयाल शर्मा, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह अशा अनेक मान्यवरांची निवड झालेली आहे. या मान्यवरांच्या पंक्तीत आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश झाला, याचा सर्वांना आनंद झाला. म्हणून आमच्या सगळ्यांची वतीने त्यांची निवड झाली, त्यांना हा पुरस्कार देण्यात येतोय, त्यांचं अंत:करणापासून अभिनंदन करतो.


 
 PM Modi Pune visit "लोकमान्य टिळक पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा कारण…” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मराठीने जिंकली पुणेकरांची मनं

 PM Modi Pune visit:  महारष्ट्राच्या भूमीला मी कोटी कोटी वंदन करतो,  नरेंद्र मोदींनी मराठीत आपल्या भाषणाची सुरुवात करताच उपस्थितांनी टाळ्या वाजवत कौतुक केलं. लोकमान्य टिळक पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे. पुण्याच्या पुण्यभूमीत येण्याची मला संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. पुणे ही टिळक, फुले, चाफेकर या वीरांची भूमी आहे.  लोकमान्य टिळक पुरस्कार स्विकारताना मला  आनंद होत असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. 


 
 PM Modi Pune visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

 PM Modi Pune visit:   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2023 ने पुण्यात सन्मानित करण्यात आले आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दिपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्यावतीने लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त हा पुरस्कार दिला जातो. पुणेरी पगडी, शाल, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.


 
PM Modi : "लोकमान्य टिळक पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा कारण…” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मराठीने जिंकली पुणेकरांची मनं
देशात  पुण्याला आणि  काशीला विशेष महत्त्व आहे. लोकमान्य टिळक पुरस्काराची रक्कम नमामि गंगा या प्रोजेक्टला देण्याचा निर्णय घेतला आहे, असे मोदी यावेळी म्हणाले. Read More
PM Narendra Modi Pune Visit Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचं भरभरुन कौतुक; म्हणाले जगभरात...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जगभरातले लोक महत्वाचा नेता म्हणून पाहतात ही अभिमानाची गोष्ट आहे, असं म्हणत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींचं भरभरुन कौतुक केलं. Read More
PM Narendra Modi Pune Visit Eknath shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचं भरभरुन कौतुक; म्हणाले जगभरात...

PM Narendra Modi Pune Visit Eknath shinde :   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जगभरातले लोक महत्वाचा नेता म्हणून पाहतात ही अभिमानाची गोष्ट आहे, असं म्हणत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींचं भरभरुन कौतुक केलं.  पुण्यात नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. याच सोहळ्यात शिंदेंनी मोदींच्या कार्याचा पाढा वाचला आणि त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. 


 
 PM Modi Pune visit:  PM Modi Pune visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी दगडूशेठ गणपती चरणी लीन

 PM Modi Pune visit:  लोकमान्य टिळक पुरस्काराने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान होणार आहे. त्यापूर्वी त्यांनी पुण्यातील दगडूशेठ मंदिरात हजेरी लावली.पुणेकरांच्या लाडक्या बाप्पाच्या चरणी मोदी लीन झाले होते. य़ावेळी दगडूशेठ मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे.मोदींच्या हस्ते  दगडूशेठ गणपतीला अभिषेक आणि महाआरती करण्यात आली.यावेळी नागरिकांनी मोदींची एक झलक पाहण्यासाठी मोदी गर्दी केली होती. बाप्पाच्या आरतीवेळी त्यांच्यासोबत विविध भाजपचे स्थानिक नेते उपस्थित होते.


 
 PM Modi Pune visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल

 PM Modi Pune visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोदींचं पुण्यातील कृषीविद्यालयाच्या हेलिपॅडवर स्वागत केलं आहे. अखेर मोदींचा पुणे दौरा सुरु झाला आहे.


 

 
PM Modi Pune visit: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

 PM Modi Pune visit: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरातील सारसबाग येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार सुनील कांबळे, पुणे जिल्हा मातंग संघाचे अध्यक्ष भिमराव साठे, सहदेव ढवरे आदी उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्हा मातंग समाज व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समितीच्यावतीने आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या दुर्मिळ चित्र प्रदर्शनास भेट दिली. जिल्हा मातंग संघाच्यावतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी शासकीय विश्रामगृह येथेही मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


 
 PM Modi Pune visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यनगरीत दाखल

 PM Modi Pune visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोदींचं पुण्यातील कृषीविद्यालयाच्या हेलिपॅडवर स्वागत केलं आहे. अखेर मोदींचा पुणे दौरा सुरु झाला आहे. राज्यपाल रमेश बैसदेखील उपस्थित होते. 


 
 PM Modi Pune visit: पंतप्रधान मोदी काहीच वेळात पुण्यनगरीत दाखल होणार

 PM Modi Pune visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच वेळात पुण्यात दाखल होणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोदींचं पुण्यातील कृषीविद्यालयाच्या हेलिपॅडवर स्वागत करणार आहे. त्यानंतर मोदींचा पुणे दौरा सुरु होईल.


 
Sharad pawar and Narendra Modi : सत्तानाट्यानंतर पहिल्यांदाच मोदी अन् शरद पवार एकाच मंचावर; 'इंडिया'त नाराजी, दोघांच्या भाषणाकडे देशाचं लक्ष
राज्यातील सत्तानाट्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहे. Read More
 PM Modi Pune visit: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

 PM Modi Pune visit:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन  करण्यासाठी पोहचले आहेत. त्यानंतर दोघे पुढील कार्यक्रमांसाठी रवाना होणार आहे. 


 
PM Modi Pune visit: आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त, हिच हुकुमशाहीची सुरुवात- कुमार सप्तर्षी

 PM Modi Pune visit:  लोकमान्य टिळक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काहीही संबंध नाही. तरीही त्यांना पुरस्कार देण्यात येत आहे. मोदी लोकशाही पाळत नाही. लोकसभेत येत नाहीत. बोलतदेखील नाही. मणिपूरमध्ये हिंसाचार झाला. त्यावर मोदी काही बोलले नाहीत. असं चित्र असताना पुरस्कार स्विकारत असतील तर त्यावर बहिष्कार टाकला पाहिजे. या आंदोलानाच्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हेच चित्र हुकुमशाहीची सुरुवात असल्याचं दिसत असल्याचं कुमार सप्तर्षी यांनी म्हटलंय.


 
 PM Modi Pune visit: मोदींच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या विरोधकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

 PM Modi Pune visit:  पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आंदोलन करणाऱ्या विरोधकांनी पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आमदार रविंद्र धंगेकर,  मोहन जोशी,  रमेश बागवे इत्यादी नेते आंदोलन करत होते. त्यावेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांसोबत असलेल्या कार्यकर्त्य़ांनादेखील ताब्यात घेतलं आहे. बाजीराव रस्त्य़ावर आंदोलन करण्यात येत आहे.

 PM Modi Pune visit: दिवंगत खासदार गिरीश बापट यांचंं कुटुंब मोदींची भेट घेणार

 PM Modi Pune visit:  पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील कार्यक्रम संपल्यानंतर पाऊण तास राखीव ठेवण्यात आला आहे. या वेळी दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबातील तीन सदस्य,  दिवंगत हेमंत लेले यांच्या कुटुंबातील सहा सदस्य मोदींना भेटणार आहेत. त्याचबरोबर मुकुंद कोंढावळेकर,  केदार तांबे आणि विनया मेहंदळे या तीन व्यक्ती देखील मोदींची भेट घेणार आहेत.


 
PM Modi Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, विरोधक दाखवणार काळे झेंडे
पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार सोहळ्यासाठी शरद पवार उपस्थित राहणार आहेत. Read More
 PM Modi Pune visit:  विरोधक मोदींना काळे झेंडे दाखवणार; अलका टॉकीज चौकात तयारी सुरु

 PM Modi Pune visit:  देशाचं राज्य जळत असताना मोदी पुणे दौऱ्यावर येत आहेत. राज्य जळत असल्याने मोदींच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आम्ही मागे हटणार नाही मोदींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवणारच, असं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितलं आहे. पुण्यातील अलका टॉकीज चौकात आंदोलनाची मोठी तयारी करण्यात आली आहे.


 
 PM Modi Pune visit:  मोदींच्या कार्यक्रमासाठी वाहतुकीत मोठा बदल

 PM Modi Pune visit:  पुणे शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आयोजित केला असल्याने त्याअनुषंगाने आवश्यक ते वाहतूक बदल करण्यात येणार असल्याचे पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे. एक ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता ते दुपारी 3 वाजेपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात आवश्यकतेप्रमाणे पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, सेवासदन चौक, अलका चौक, टिळक रोड, जेधे चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, संगमवाडी रोड, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रोड आदी ठिकाणांवरील वाहतूकीत बदल करण्यात येतील.


 
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार उद्योगपतींची भेट

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील कार्यक्रम संपल्यानंतर पुण्यातील आघाडीच्या उद्योगपतींसोबत चर्चा करणार आहेत.  त्यासाठी पाऊण तास वेळ राखून ठेवण्यात आलाय.  मोदींच्या या भेटीमधे सहा मोठे उद्योगपती सहभागी होणार आहेत. 

 Pune Modi Visit: विरोधी पक्षाच्या आंदोलनाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

 Pune Modi Visit: पुण्यातील मंडई परिसरात महाविकास आघाडीच्या वतीने मोदींच्या विरोधात करण्यात येणाऱ्या आंदोलनाच्या पार्शभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  गो बॅक मोदी म्हणत विरोधी पक्ष पुण्यात करणार मोदींच्या दौऱ्याला विरोध करणार आहेत. 

PM Modi Pune visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला विरोध, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक पक्षांचं आज पुणे शहरात आंदोलन

 PM Modi Pune visit:  पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट तसेच काही संघटनांचा विरोध आहे. गो बॅक मोदी म्हणत विरोधी पक्ष पुण्यात पंतप्रधानांच्या दौऱ्याला विरोध करणार आहेत. ज्या मंडई परिसरात आंदोलन केलं जाणार आहे, त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय. दरम्यान, शरद पवार कार्यक्रमात तर कार्यकर्ते मोदींच्या विरोधात आंदोलनात असतील. पवारांनी या कार्यक्रमात सहभागी होऊ नये, अशी विनंती काल मविआचे पुण्यातील नेते करणार होते. 

पार्श्वभूमी

PM Modi Pune visit:  पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत.. लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रदान करण्यात येणार आहे. आणि पुरस्कार सोहळ्यासाठी शरद पवार उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यात अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करणार आहेत.तसंच पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करणार आहेत. यामध्ये अंडरग्राउंड मेट्रोचा देखील समावेश आहे.सोबतच अनेक कार्यक्रमही नियोजित आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे पुण्यात आज वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेत. दरम्यान, या पुरस्कार सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतील बंडानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार आहे.


'या' मार्गांवरील वाहतुकीत बदल  


 पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, सेवासदन चौक, अलका चौक, टिळक रोड, जेधे चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, संगमवाडी रोड, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रोड इत्यादी ठिकाणांवरील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी गैरसोय होऊ नये, यासाठी या मार्गांचा वापर टाळून अन्य पर्यायी मार्गांचा वापर करावा, असं आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आलं आहे.


सारसबागेकडे जाणारा मार्ग खुला


टिळक रस्त्याने एस. पी. कॉलेज चौकात आल्यानंतर ना. सी. फडके चौकाकडे जाण्यासाठी (एस. पी. कॉलेज चौकातून) उजवीकडे जाणारा मार्ग खुला करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना या मार्गाचा वापर करता येणार आहे.


जेधे चौकातून सारसबागेकडे जाण्यास प्रवेश बंद


जेधे चौकातून सारसबागेकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. सिंहगड रस्त्यावर जाण्यासाठी जेधे चौकातून सातारा रोड, मित्रमंडळ चौक, सावरकर चौक मार्गे सिंहगड रस्ता या मार्गाचा वापर करण्याचं अवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आलं आहे. सिंहगड रस्त्यावरून स्वारगेटला जाण्यासाठी सावरकर चौक, मित्रमंडळ चौक, व्होल्गा चौक, जेधे चौक या मार्गाचा वापर करण्याचं अवाहन करण्यात आलं आहे. जेधे चौकातील फ्लायओव्हरवरून सारसबागेकडे जाण्यास प्रवाशांना बंदी घालण्यात आली आहे.


पुणे मेट्रो टप्पा 1 च्या कार्य पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांच्या सेवेचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. हे विभाग फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय स्थानक तसेच गरवारे महाविद्यालय स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानकापर्यंत आहेत. 2016 मध्ये पंतप्रधानांच्याच हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी झाली होती. मेट्रो रेल्वेचे हे नवीन विभाग पुणे शहरातील शिवाजी नगर, दिवाणी न्यायालय, पुणे महानगरपालिका कार्यालय, पुणे आरटीओ आणि पुणे रेल्वे स्थानक यांसारखी महत्त्वाची ठिकाणे जोडतील. देशभरातील नागरिकांना आधुनिक आणि पर्यावरणस्नेही गतिमान शहरी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला साकार करण्याच्या दिशेने हे लोकार्पण एक महत्त्वाचे पाऊल आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.