एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
होळी खेळताना स्कूल बसमधून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू
बसमधून खाली पडल्यामुळे पिंपरीत नववीत शिकणाऱ्या राज कांबळे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
![होळी खेळताना स्कूल बसमधून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू Pimpri : School student dies after falling from school bus while playing holi latest update होळी खेळताना स्कूल बसमधून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/01181836/Raj-Kamble-Pimpri-school-bus-student.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पिंपरी चिंचवड : धुलिवंदनाचा उत्साह शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. धावत्या स्कूल बसमध्ये होळी खेळणं एका विद्यार्थ्याच्या जीवावर बेतलं आहे. बसमधून खाली पडल्यामुळे पिंपरीत नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
पिंपरीतील मोझे स्कूलमध्ये शिकणाऱ्या राज कांबळेचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला. शुक्रवारी धुलिवंदनाची सुट्टी असल्यामुळे आदल्या दिवशी शाळेतून घरी जाताना स्कूल बसमध्ये काही विद्यार्थी रंग खेळत होते. काही जण एकमेकांना रंग लावत होते, तर कोणी फुगा फेकून मारत होतं.
धावत्या बसमध्ये होळी खेळताना राजचा पाय घसरला आणि तो थेट बसमधून खाली पडला. बसमधून पडून मार लागल्यामुळे राजचा मृत्यू झाला.
होळी-रंगपंचमी खेळावी, मात्र खेळताना काळजी जरुर घ्यावी, असं आवाहन यानिमित्ताने करण्यात येत आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion