पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये दोन गटातील वादातून वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी विकी घोलप गटाच्या 7 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
मंगलमूर्ती वाड्याजवळील सुमारे 17 वाहनं काल फोडण्यात आली. विकी घोलप गटाचा प्रशांत यादव यांच्या टोळीतील वादातून ही तोडफोड झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
काल रात्री साडेदहाच्या सुमारास मंगलमूर्तीवाडा परिसरात या टोळक्याने वाहनांची तोडफोड केली. याप्रकारामुळे परिसरात दहशत पसरली.
या तोडफोडीत रिक्षा, कार, टेंपो अशा वाहनांवर लाकडी दांडके, दगडाने हल्ला करुन त्यांची तोडफोड कऱण्यात आली.