पुणे/मुंबई:  खंडाळ्याजवळील मंकी हिल परिसरात मालगाडीचे डबे घसरल्याने विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक अजूनही विस्कळीतच आहे. मालगाडीचे घसरलेले सहा डबे हटवण्याचं काम अद्यापही सुरु आहे. सध्या मुंबईहून पुण्याकडे जाणारी रेल्वेवाहतूक सुरु झाली आहे. मात्र दोन्ही बाजूने रेल्वे उशिरा धावत आहेत. तर डाऊन लाईन सुरु करण्यासाठी संध्याकाळपर्यंतची वाट पाहावी लागणार आहे. डाऊन लाईन सुरु झाल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर येईल. मुंबईवरुन उद्यान एक्स्प्रेस ही पहिली रेल्वे सोडण्यात येईल, जी बंगळुरुपर्यंत धावेल. तर मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस रद्द झाली आहे. दरम्यान मालगाडीचे घसरलेले सहा डबे हटवण्याचं काम अद्यापही सुरु आहे. रात्रभराच्या कामानंतर मध्य मार्गिका सुरु करण्यात यश आलंय. मात्र डाऊन दिशेची लाईन अद्यापही बंद आहेत. डबे हटवून परिस्थिती पूर्ववत होण्यास आणखी काही तास लागण्याची शक्यता आहे. मंकी हिल परिसर हा घाटाचा भाग आहे. इथं घसरलेले डबे हटवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे काम पूर्ण होऊन वाहतूक सुरळीत होण्यास बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, अनेक गाड्या रद्द झाल्यानं मुंबई, पुणे आणि कोल्हापुरात प्रवाशांचा खोऴंबा झाला आहे. रद्द झालेल्या गाड्या
  • मुंबई - पुणे डेक्कन एक्स्प्रेस
  • पुण्याहून मुंबईला येणारी डेकक्न क्वीन
  • सह्याद्री एक्स्प्रेस
  • प्रगती एक्स्प्रेस
मालगाडीचे डबे घसरले काल दुपारी ४ वाजता खंडाळ्याच्या मंकी हिल परिसरात मालगाडीचे 6 डबे घसरले. यात रुळालगतचे खांबही कोसळलेत, तसंच अपघातात रेल्वे रुळाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे, मात्र वाहतुकीचेही तीन तेरा वाजलेत.  मंकी हिल परिसर हा घाटाचा भाग आहे. इथं घसरलेले डबे हटवण्यात मोठ्या अडचणी येतायत. तिकडे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी तातडीची बैठक घेऊन सुरक्षेचा आढावा घेतलाय. संबंधित बातम्या खंडाळ्याजवळ मालगाडीचे 6 डबे घसरले, मुंबई-पुणे वाहतूक विस्कळीत