पुणे : काही दिवसांपूर्वी पोर्शे कारच्या अपघाताने पुणे (Pune Accident) हादरलं होतं, पिंपरीतही तशाच प्रकारची घटना घडली. मात्र दैव बलवत्तर म्हणून त्या अपघातातील मुलीला काही झालं नाही. मात्र या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल (Pimpri Chinchwad Accident CCTV Video Viral) झाल्यानंतर आता पिंपरी पोलिसांना जाग आली असून त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. 


पिंपरीत एका भरधाव वेगाने आलेल्या कारने एका मुलीला उडवलं होतं. मात्र इतका भीषण अपघात होऊन ही पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केलाच नव्हता. अखेर या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला अन एबीपी माझाने हा प्रकार समोर आणला. त्यानंतर हिंजवडी पोलिसांना जाग आली असून बुधवारी सकाळी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. 


या अपघातात जखमी आकांक्षा परदेशी या तरुणीला केवळ मुका मार लागल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र पहिल्या दिवशी म्हणजे, 23 मे ला गुन्हा दाखल का केला नाही? तीन आठवड्यानंतर गुन्हा दाखल करायची तसदी का घेतली? उपस्थित झालेल्या या प्रश्नांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न आता पिंपरी चिंचवड पोलीस करत असल्याचं चित्र आहे. 


नेमकं काय घडलं? 


पिंपरीत एका भरधाव कारने रस्त्याच्या बाजूने निघालेल्या महिलेला उडवले. कारचा वेग इतका होती की धडकेने ती बरेच फूट लांब फेकली गेली. त्यानंतर कार थेट एका दुकानात घुसली. या दृश्यातून महिलेला मोठी इजा पोहचली असेल असंच स्पष्टपणे दिसून येतंय. हिंजवडी पोलिसांच्या हद्दीतील भुजबळ चौकात हा अपघात झाला होता. 


महिलेला मुका मार लागला


इतका भीषण अपघात होऊनही यामध्ये त्या महिलेला काहीच झालं नाही. कारच्या धडकेत ती महिला वरती उडाली आणि बाजूला पडली, त्यामध्ये केवळ तिला मुका मार लागल्याचं समजतंय. त्यामुळे त्यामुळं महिलेने आणि तिच्या कुटुंबियांनी चालकाविरोधात कोणतीही तक्रार दिली नाही असं हिंजवडी पोलिसांचं म्हणणं आहे. परंतु पोर्शे कार अपघात प्रकरणात पोलिसांवर प्रश्न उपस्थित झाले असताना यातून धडा घेत पोलिसांनी स्वतःहून गुन्हा का दिली नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना जाग आली आणि गुन्हा नोंदवण्यात आल्याने त्यांच्या कार्यतत्परतेवर शंका उपस्थित केली जात आहे. 


ही बातमी वाचा: