Sharad Pawar : आचारसंहिता (code of conduct) असल्याचे कारण देत शेतकऱ्यांना (Farmers) मदत मिळत नसल्याचे काही शेतकऱ्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले. यावर शरद पवार यांनी ‌दोन दिवस थांबा, सगळं सरळ करु असे वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलताना शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर टीकाही केली. चंद्राबाबू नायडू आणि नितिश कुमार नसते तर यांचं सरकार बनलं नसतं. डोक्यात हवा गेली अणि पाय जमिनीवर राहिले नाहीत की, या देशातील जनता योग्य वेळी योग्य निर्णय घेते हे लोकांनी दाखवून दिल्याचे शरद पवार म्हणाले.


आम्ही मित्रपक्षांसह एकत्र येऊन लोकांसाठी काम करण्याचं ठरवलंय


माझ्यासह सोनिया गांधी आणि इतर मित्रपक्षांनी ठरवलं आहे, की लोकांसाठी एकत्र काम करायचे आहे असे शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी आज वाल्हे गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. आता जो पाऊस पडतोय तो अपुरा आहे. त्याने प्रश्न सुटत नाही. या भागासाठी गुंजवणी पाणीपुरवठा योजना पुर्ण होणे आवश्यक असल्याचे शरद पवार म्हणाले. त्यासाठी राज्य सरकारने निधी द्यावा असेही पवार म्हणाले. या प्रकल्पाची सुरुवात माझ्या सहीने झाली आहे. पण पुढे कालव्यांची कामे झाली नाहीत. मी हा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री यांच्यासोबत बैठक घेण्यास तयार असल्याचे शरद पवार म्हणाले. ही बैठक पुण्यात होईल किंवा मुख्यमंत्री म्हणतील तिथे मी जायला तयार असल्याचे पवार म्हणाले. 


मोदींच्या मनात समाजातील काही घटकांबद्दल आकस 


देशाचं राजकारण बदलत आहे. मोदींच्या मनात समाजातील काही घटकांबद्दल आकस असल्याचे शरद पवार म्हणाले. मोदींनी भाषणातून समाजात दुही निर्माण केली आहे. मी गेली 56 वर्षे एकही दिवस खाडा न जाता लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय. या काळात अनेक पंतप्रधान पाहिले. काहींसोबत कामही केलं. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह अनेकांनी देशाचे हित पाहीलं. पण सध्याची परिस्थिती वेगळी असल्याचे म्हणत शरद पवारांनी भाजपवर टीका केली. शरद पवार हे आज विविध ठिकाणच्या दौऱ्यावर होते. त्यांनी सुरुवातीला वाल्हे गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केल्याचं पाहायला मिळालं.


महत्वाच्या बातम्या:


पक्षातील अंतर्गत वाद शरद पवारांची डोकेदुखी ठरण्याची शक्यता; रोहित पवार अन् जयंत पाटील यांच्यात नेमकं काय घडतंय?