एक्स्प्लोर

पतीच्या मित्राकडून विनयभंग, पिंपरीत महिलेची बाल्कनीतून उडी

पाणी मागण्याचा बहाणा करत आरोपी घरात घुसला. पीडित महिलेचं तोंड दाबून त्याने तिला चाकूचा धाक दाखवला.

पिंपरी चिंचवड : पिंपरीत अब्रू वाचवण्यासाठी महिलेने बाल्कनीतून उडी घेतल्याच्या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. पतीच्या मित्रानेच महिलेचा विनयभंग केल्याचं उघड झालं आहे. वाकड पोलिसांनी आरोपी किशोर शेलारच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुरुवारी रात्री पीडित महिलेचा पती दारुच्या नशेत होता. तेव्हा एकाने त्याचा मोबाईल काढून घेतला. मोबाईल चोराच्या शोधात असताना पीडित महिलेच्या पतीला आरोपी किशोर शेलार भेटला. किशोरने मोबाईल चोराला शोधून देण्याचं आश्वासन त्याला दिलं. शोधाशोध सुरु असतानाच पीडित महिलेचा पती पुन्हा एकदा किशोरला घेऊन दारु प्यायला बसला. नशेतच मध्यरात्री दोन वाजता किशोरला घेऊन महिलेचा पती घरी आला. त्यानंतर किशोर परत महिलेच्या पतीला घेऊन घराबाहेर पडला. चोराला शोधून आणतो असं सांगून किशोरने महिलेच्या पतीला रस्त्यातच थांबवलं आणि तो त्याच्या घरी आला. पतीने पोलिस स्टेशनमध्ये बोलावलं आहे, माझ्यासोबत चला, असं किशोरने पीडित महिलेला खोटंच सांगितलं.
मध्यरात्री घरात घुसून अतिप्रसंग, महिलेची इमारतीवरुन उडी
दोन्ही मुलं घरी असल्यामुळे तुम्ही पुढे जा, असं महिलेने सांगितलं. पाणी मागण्याचा बहाणा करत आरोपी घरात घुसला. पीडित महिलेचं तोंड दाबून त्याने तिला चाकूचा धाक दाखवला. तुम्ही सुंदर दिसता, मला तुमच्याशी शरीरसंबंध ठेवायचे आहेत. तसं न केल्यास दोन्ही मुलांना जीवे मारुन टाकेन अशी धमकी किशोरने महिलेला दिली. पीडित महिलेने किशोरच्या तावडीतून कशीबशी सुटका करुन घेतली. झटापटीत चाकूने डाव्या हाताच्या बोटांना इजा झाली. महिला बेडरुमच्या बाल्कनीत आली आणि तिने अब्रू वाचवण्यासाठी पहिल्या मजल्यावरुन खाली उडी मारली. महिला एका चारचाकी वाहनावर पडल्यामुळे तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. वाकड पोलिसांनी किशोरला सीसीटीव्हीच्या आधारे शोधून बेड्या ठोकल्या. किशोरवर याआधी हत्या, हल्ला करणे आणि अमली पदार्थ बाळगल्याचे तीन गुन्हे दाखल आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking News Updates: नसरापूर चिमुकली अत्याचार प्रकरण; विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाच्या कामकाजाला सुरवात
Maharashtra Live Breaking News Updates: नसरापूर चिमुकली अत्याचार प्रकरण; विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाच्या कामकाजाला सुरवात
Ketan Agarwal Death Case: केतन पडताना आपल्याला पकडू नये म्हणून सियाने काय केलं?, केतनच्या मृत्यू प्रकरणात चक्रावून टाकणारी माहिती समोर, तो खाली पडल्यानंतर 15 मिनिटं सियाचा 'फोन ड्रामा'
केतन पडताना आपल्याला पकडू नये म्हणून सियाने काय केलं?, केतनच्या मृत्यू प्रकरणात चक्रावून टाकणारी माहिती समोर, तो खाली पडल्यानंतर 15 मिनिटं सियाचा 'फोन ड्रामा'
Maharashtra Rain Weather Updates: संपूर्ण महाराष्ट्रात पुढील 6 दिवस पावसाचा यलो अलर्ट; मुंबईपासून, ठाणे, कोकण, मराठवाडा, विदर्भातील मान्सूनचे A टू Z अपडेट्स
संपूर्ण महाराष्ट्रात पुढील 6 दिवस पावसाचा यलो अलर्ट; मुंबईपासून, ठाणे, कोकण, मराठवाडा, विदर्भातील मान्सूनचे A टू Z अपडेट्स
Ketan Agarwal Death Case: 'त्याच्यासोबत एकाच रूममध्ये राहायचं नव्हतं म्हणून...'; महाबळेश्वरच्या ट्रिप आधीच केतनला लोहगडावर संपवलं, आरोपी सियाचा चक्रावून टाकणारा खुलासा!
'त्याच्यासोबत एकाच रूममध्ये राहायचं नव्हतं म्हणून...'; महाबळेश्वरच्या ट्रिप आधीच केतनला लोहगडावर संपवलं, आरोपी सियाचा चक्रावून टाकणारा खुलासा!

व्हिडीओ

Eknath Shinde Speech : शेतकरी, वारकरी, कार्यकर्ते संकटात असताना घरात होते, आता वरात काढून फिरतायत
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? | ABP Majha Special Report
Baramati Ujni Flemingo | फ्लेमिंगो रुसले, पर्यटक आटले | ABP Majha Special Report
Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Heatwave in Across Europe: थंडगार असणाऱ्या युरोपात उष्णतेचा आगडोंब, फ्रान्समध्ये तब्बल 1 हजार जणांचा बळी; ब्रिटनच्या इतिहासात रेड अलर्ट, स्पेन, जर्मनी, इटलीत सुद्धा उष्णतेचा कहर, डेन्मार्कला रस्ते विघळले
थंडगार असणाऱ्या युरोपात उष्णतेचा आगडोंब, फ्रान्समध्ये तब्बल 1 हजार जणांचा बळी; ब्रिटनच्या इतिहासात रेड अलर्ट, स्पेन, जर्मनी, इटलीत सुद्धा उष्णतेचा कहर, डेन्मार्कला रस्ते विघळले
Modi Cabinet Reshuffle: मोदी सरकारमधून या 6 मंत्र्यांची उचलबांगडी होणार? श्रीकांत शिंदे, संजय दिना पाटलांसह 9 नवीन चेहरे, वादात अडकलेल्या धर्मेंद्र प्रधान आणि निर्मला सीतारामनांचा सुद्धा काय निर्णय झाला??
मोदी सरकारमधून या 6 मंत्र्यांची उचलबांगडी होणार? श्रीकांत शिंदे, संजय दिना पाटलांसह 9 नवीन चेहरे, वादात अडकलेल्या धर्मेंद्र प्रधान आणि निर्मला सीतारामनांचा सुद्धा काय निर्णय झाला??
Uddhav Thackeray: डॅमेज कंट्रोलपासून ते ऑपरेशन देवेंद्र फडणवीसपर्यंत..., उद्धव ठाकरेंनी विदर्भ अन् मराठवाड्याच्या दौऱ्याते नेमकं कोणत्या गोष्टींवर भर दिला? वाचा Inside स्टोरी
डॅमेज कंट्रोलपासून ते ऑपरेशन देवेंद्र फडणवीसपर्यंत..., उद्धव ठाकरेंनी विदर्भ अन् मराठवाड्याच्या दौऱ्याते नेमकं कोणत्या गोष्टींवर भर दिला? वाचा Inside स्टोरी
Nasrapur Case Verdict : नसरापूर अत्याचार प्रकरणात आज अंतिम फैसला; नराधम कांबळेला फाशी की जन्मठेप? आज ठरणार, मागील सुनावणीवेळी कोर्टात काय घडलं?
नसरापूर अत्याचार प्रकरणात आज अंतिम फैसला; नराधम कांबळेला फाशी की जन्मठेप? आज ठरणार, मागील सुनावणीवेळी कोर्टात काय घडलं?
Shraddha Kapoor Eetha Movie Controversy: 'ईठा' सिनेमावर विठाबाई नारायणगावकरांचे कुटुंबीय नाराज, निर्मात्यांकडे केल्यात दोन मोठ्या मागण्या, नाहीतर कायदेशीर कारवाईचा इशारा
'ईठा' सिनेमावर विठाबाई नारायणगावकरांचे कुटुंबीय नाराज, निर्मात्यांकडे केल्यात दोन मोठ्या मागण्या, नाहीतर कायदेशीर कारवाईचा इशारा
Nagpur Accident News: थरारक! नागपुरात भरधाव कार थेट पोहेवाला शॉपमध्ये घुसली, कारसह दुकानाच मोठं नुकसान, मध्यरात्री रस्त्यांवर रेसिंगच्या नादात अपघात?
थरारक! नागपुरात भरधाव कार थेट पोहेवाला शॉपमध्ये घुसली, कारसह दुकानाच मोठं नुकसान, मध्यरात्री रस्त्यांवर रेसिंगच्या नादात अपघात?
Buldhana Accident News : बुलढाण्याच्या नांदुराजवळ भीषण अपघात, नागपूरहून जळगावकडे जाणारी भरधाव खाजगी प्रवासी बस पलटीली, दहा ते बारा प्रवासी जखमी
बुलढाण्याच्या नांदुराजवळ भीषण अपघात, नागपूरहून जळगावकडे जाणारी भरधाव खाजगी प्रवासी बस पलटीली, दहा ते बारा प्रवासी जखमी
Maharashtra Live Breaking News Updates: नसरापूर चिमुकली अत्याचार प्रकरण; विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाच्या कामकाजाला सुरवात
Maharashtra Live Breaking News Updates: नसरापूर चिमुकली अत्याचार प्रकरण; विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाच्या कामकाजाला सुरवात
Embed widget