पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील रहाटणी भागात एका व्यावसायिकाची हत्या करुन लूटमार करण्यात आली. हत्या झालेल्या अनिल धोत्रे यांचं काळेवाडी भागात 'ज्योती टूर्स अँड ट्रॅव्हल्स'चं ऑफिस होतं.
धोत्रे मनी ट्रान्सफरचा व्यवसाय करत असल्यामुळे त्यांच्याकडे मोठी रक्कम जमा होते. सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास धोत्रे नेहमीप्रमाणे ऑफिस बंद करुन दुचाकीने घरी निघाले होते.
ऑफिसपासून काही अंतरावर गेल्यानंतर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. धोत्रे जखमी अवस्थेत खाली पडल्यानंतर मारेकऱ्यांनी त्यांच्याजवळ असलेली पैशाची पिशवी घेऊन पळ काढला.
नागरिकांनी धोत्रे यांना तात्काळ थेरगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. वाकड पोलीस लुटारु हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
पिंपरीत व्यावसायिकाची हत्या, पैशांची पिशवी लुटून मारेकरी पसार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jul 2018 10:06 AM (IST)
पिंपरी चिंचवडमधील रहाटणी भागात व्यावसायिक अनिल धोत्रे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांच्याकडील पैशांची पिशवी लुटून मारेकरी पसार झाले

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -