एक्स्प्लोर

पुणे : मुठा नदीपात्रात बांधकामाला परवानगी, बिल्डर अतुल चोरडियांच्या प्रकल्पाचं काम सुरु

पुण्यातील मुठा नदीच्या पात्रातील डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्यातील साडे चार एकर जागेवरील आरक्षण उठवून निवासी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बांधकाम व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या आलिशान गृहप्रकल्पाचं बांधकामही लगेच त्या ठिकाणी चालू झालं. एकीकडे नदी सुधारसाठी गाणं गात लोकांना संदेश देणाऱ्या मुख्यमंत्रांकडे असलेलं खातं असा निर्णय कसा घेऊ शकतं असा प्रश्न यामुळे विचारला जाऊ लागला आहे.

पुणे : पुण्यातील मुठा नदीच्या पात्रातील डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्यातील साडे चार एकर जागेवरील आरक्षण उठवून निवासी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बांधकाम व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या आलिशान  गृहप्रकल्पाचं बांधकामही लगेच त्या ठिकाणी चालू झालं. एकीकडे नदी सुधारसाठी गाणं गात लोकांना संदेश देणाऱ्या मुख्यमंत्रांकडे असलेलं खातं असा निर्णय कसा घेऊ शकतं असा प्रश्न यामुळे विचारला जाऊ लागला आहे. शहराच्या मधोमध पुणे-अहमदनगर रस्त्यालगतच्या कल्याणीनगरसारख्या परिसरात सलीम अली पक्षी अभयारण्याच्या आरक्षणामुळे हिरवळ इथं टिकून राहिली आहे. 1987 साली पुणे महापालिकेने बावीस एकरांचा हा पट्टा इथं मोठ्या संख्येने जमणाऱ्या देशी-विदेशी पक्ष्यांमुळे डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केला. मात्र अभयारण्याच्या मधोमध असलेली साडे चार एकर जागा निवासी क्षेत्र करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या जमिनीच्या सात बाऱ्यावर सरकारचं  नाव असतानाही ही जागा खाजगी असल्याचं दाखवून हा प्रकार करण्यात आला आहे. पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अतुल चोरडिया यांना याच ठिकाणी आलिशान गृहप्रकल्प उभारायचा आहे. राज्य सरकारने आरक्षण उठवण्याचा निर्णय घेतल्यावर लगेच याठिकाणी बांधकामही सुरु करण्यात आलं आहे. मात्र या बांधकामामुळे मुठेच्या नदीपात्रात अतिक्रमण होत आहे. मुठा नदीच्या ब्लु लाईनच्या आतमध्ये येणारी जागाच पक्षी अभयारण्य म्हणून आरक्षित करण्यात आली होती. इतकंच नाही तर जवळूनच जाणाऱ्या महापालिकेच्या ड्रेनेज लाईनलाही या बांधकामांने गिळंकृत केलं आहे. मुंबईतील नदी सुधार प्रकल्पासाठी मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गायलेल्या गाण्याची महाराष्ट्रात भरपूर चर्चा झाली. नद्यांबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी या गाण्यामध्ये सहभागी झाल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांकडून यावेळी देण्यात आलं. मात्र मुंबईतील नद्यांबाबत एवढे संवेदनशील असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या खात्यानं पुण्यातील नदीबाबत असा निर्णय का घेतला असा प्रश्न आता सर्वसामान्य पुणेकर विचारत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजमध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचं रॅगिंग, कंटाळून होस्टेल सोडलं, 14 दिवसांपासून संपर्कच नाही!
पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजमध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचं रॅगिंग, कंटाळून होस्टेल सोडलं, 14 दिवसांपासून संपर्कच नाही!
Pune Rain : पुणे जिल्ह्यात मुसळधार! खडकवासलासह तीन धरणं भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पुणे जिल्ह्यात मुसळधार! खडकवासलासह तीन धरणं भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Ujani Helicopter Fish : घरातील फिशटँकमधील माशाने डोकेदुखी वाढवली, जैवविविधता, मच्छीमार अन्‌ धरणासाठी धोक्याची घंटा, उजनी परिसर टेन्शनमध्ये!
घरातील फिशटँकमधील माशाने डोकेदुखी वाढवली, जैवविविधता, मच्छीमार अन्‌ धरणासाठी धोक्याची घंटा, उजनी परिसर टेन्शनमध्ये!
Khadakwasla Dam Water Discharge : पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून आज 43,571 क्युसेक्सने विसर्ग; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून आज 43,571 क्युसेक्सने विसर्ग; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
Bhiwandi Building Collapses: तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
Washim Crime News : गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
Embed widget