एक्स्प्लोर

चंद्रशेखर आझादांना पुण्यात एंट्री, मात्र सभा घेता येणार नाही

चंद्रशेखर आझाद यांना पुण्यात येताना पोलीस त्यांना रोखणार नाहीत, पण त्यांना पुण्यात सभा घेता येणार नाही, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. चंद्रशेखर आझाद आणि त्यांचे सहकारी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान मालाडच्या हॉटेल मनालीमधून पुण्याच्या दिशेनं निघाले होते.

मुंबई : भीमआर्मीचे चंद्रशेखर आझाद यांना पुण्यात येताना पोलीस त्यांना रोखणार नाहीत, पण त्यांना पुण्यात सभा घेता येणार नाही, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.  चंद्रशेखर आझाद आणि त्यांचे सहकारी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान मालाडच्या  हॉटेल मनालीमधून पुण्याच्या दिशेनं निघाले होते.
चंद्रशेखर आझाद यांच्या मुंबई आणि पुण्यातल्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तरीही चंद्रशेखर आझाद यांनी पुण्याला जाण्याचा निर्धार केला होता. चंद्रशेखर आझाद यांना मालाडच्या हॉटेल मनालीमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आल्याची माहिती होती. पोलिसांनी मनाली हॉटेलच्या 500 मीटर परिसरात जमावबंदी लागू केली होती.  दरम्यान आझाद यांच्या समर्थकांनी हॉटेलबाहेर जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला होता.  यावेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं होतं.
दरम्यान, भीम आर्मीला महाराष्ट्रात 2 जानेवारीपर्यंत सभा घेण्यास पोलिसांनी मज्जाव केला आहे. याशिवाय कार्यकर्त्यांनाही जवळच्या पोलीस ठाण्यात हजेरी लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. याशिवाय कोरेगाव भीमा इथं 2 तारखेपर्यंत जाण्यासही भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना मज्जाव करण्यात आला आहे. सध्या ज्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यांना बॉन्डवर सोडून देण्यात आलं आहे.
चंद्रशेखर आझाद यांची काल वरळीच्या जांबोरी मैदानात सभा होणार होती. वरळी पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली होती. शिवाय सर्व पोलीस स्टेशनवर अलर्ट जारी केला आहे. दरम्यान उद्या पुण्यातल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या व्याख्यानालाही परवानगी नाकारली आहे.
पोलिसांनी आपल्याला रूममध्ये बंद करून ठेवले आहे, अशा आशयाचा चंद्रशेखर आझाद यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. येणाऱ्या निवडणुकीत मोदी सरकारला हे महागात पडेल. . मोदी सरकारने हे युद्ध सुरु केले असून याचा अंत भीम आर्मी करणार, असा इशाराही आझाद यांनी या व्हिडीओत दिला आहे. दरम्यान मुंबई पोलीस आझाद यांना विमानात बसवून देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
आझाद पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यानिमित्त त्यांच्या राज्यात विविध ठिकाणी पाच सभा नियोजित होत्या. त्यातील पहिली सभा 29 डिसेंबर रोजी वरळीच्या जांबोरी मैदानात संध्याकाळी 4 वाजता होणार होती. त्यानंतर 30 डिसेंबरला पुण्यात सभा, 31 डिसेंबरला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व्याख्यान, 1 जानेवारीला भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, 2 जानेवारीला लातूर येथे सभा त्यानंतर 4 जानेवारीला अमरावती येथे जाहीर सभा असा नियोजित कार्यक्रम होता.

महत्त्वाच्या बातम्या

लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
Mangesh Chivate Pune Election : कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
Pune Crime News: पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
Embed widget