पुणे : पुण्यात दोन दिवस झालेल्या दमदार पावसामुळं रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे रस्त्यांच्या कामासाठी महापालिकेनं 35 कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, तरीही पुणेकरांना रस्त्यातील खड्ड्यांमधून प्रवास करावा लागतो आहे.


 

महापालिकेने 31 मे अगोदर शहरातील रस्ते नगरसेवकांच्या हट्टापायी नव्याने केले. यासाठी करोडो रुपये खर्च केले. प्रसंगी वर्गीकरणाच्या माध्यमातून या रस्त्यांसाठी करोडो  रुपयाचा निधी नगरसेवकांना  उपलब्ध करुन दिला. पण नव्याने केलेल्या या रस्त्यांवर एक महिन्याच्या आता पुन्हा खड्डे पडले असून, ठेकेदाराच्या कामाबद्दल शंका व्यकत केली जात आहे.

 

रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास वाहनचालकांना होत असून या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अनेक ठिकाणी अपघातासारख्या घटना घडत आहेत. सध्या रस्त्यांची परिस्थिती पाहता रस्त्यांचा कामाचा दर्जा सहज लक्षात येऊ शकतो. दरम्यान, दोषी ठेकेदारांवर कारवाई करण्याचं आश्वासनंही महापौरांनी दिलं