Ashadhi Wari 2022 : दोन वर्षानंतर पायी वारी (Ashadhi Wari 2022) होत असल्याने वारकऱ्यांमध्ये अमाप उत्साह आहे. मानाच्या पालखीसह अतर पालख्याही पंढरपूरकडे रवाना होत आहेत. आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना वारीबाबत माहिती होण्यासाठी व त्यांना आवश्यक त्या सोई-सुविधासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने 'आषाढी वारी 2022' ॲप विकसित करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून वारीसंदर्भातील सर्व माहिती मिळणार आहे.
या ॲपमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मार्गाचे वेळापत्रक व गावनिहाय नकाशा, पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या थेट दर्शनाची सोय, पालखीचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख यांचे संपर्क क्रमांक, वैद्यकीय सुविधा त्यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी, फिरते वैद्यकीय पथक, शासकीय रुग्णालये व वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकरी, खासगी वैद्यकीय व्यावसायिक, पाण्याच्या सुविधेच्या दृष्टीने मार्गावरील टॅकर सुविधा, अन्न पुरवठा आणि वितरणबाबत, विद्युत सेवा, पशुधन बाबत सेवेसाठी संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.
पालखी सोहळ्याशी संबंधित विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकदेखील या ॲपमध्ये देण्यात आले आहेत. भाविकांनी गुगल प्लेस्टोवरील https://play.google.com/store/apps/details?id=com.deecto.ashadhiwari या लिंकवरुन आषाढी वारी 2022 हे ॲप डाऊनलोड करुन घ्यावे. तसेच भाविकांनी वारीदरम्यान अडचणीच्या वेळी या ॲपवरील संबंधित संपर्क अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.
आषाढी वारी निर्मल वारी होण्यासाठी ग्रामविकास विभागाचा पुढाकार, नऊ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी : हसन मुश्रीफ
आज (20 जून) संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान होणार आहे. यासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा उद्या (21 जून) प्रस्थान होणार आहे. दरम्यान, पंढरपूरची आषाढी वारी निर्मल वारी होण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागानं पुढाकार घेतला आहे. पंढरपूरला जाणाऱ्या पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यासाठी 2 कोटी 59 लाख 75 हजार रुपयांचा निधी तर वारकरी, भाविकांना तात्पुरत्या स्वच्छता सुविधा पुरवण्यासाठी 6 कोटी 73 लाख 20 हजार रुपयांच्या निधीस राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. यामुळं पंढरपूरची आषाढी वारी निर्मल वारी होण्यासाठी मदत होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
संबंधित बातम्या :
- Ashadhi Wari: पैठणनगरीतून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान
- Ashadhi Wari 2022: 'या' कारणामुळे अजित पवारांचा देहू दौरा रद्द; रोहित पवार, सुनेत्रा पवार उपस्थित
- Ashadhi Wari 2022: ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं उद्या प्रस्थान; आळंदी नगरी दुमदुमली
- Saint Tukaram : बोला पुंडलिक वरदे... संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान