Sant Eknath Maharaj Palkhi: महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमाकांचा पालखी सोहळ्याचे मान असलेल्या पैठणच्या संत एकनाथ महाराज यांची पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. सायंकाळी पाच वाजेच्या सुमरास पैठण येथून पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केलं. तब्बल 19 मुक्काम करत नाथांची पालखी 9 जुलै रोजी पंढरपुरात दाखल होणार आहे.

  


सकाळी गावातील नाथ मंदिर येथे नाथांच्या पादुकांचे विधिवत पूजन करून पालखीत पादुका ठेवण्यात आल्या. यावेळी पालखीची आकर्षक सजावट करण्यात आली. दुपारी साडेबाराच्या दरम्यान नाथ वाड्यातून पालखीने प्रस्तान ठेवले. त्यांनतर पालखी नाथांच्या समाधी मंदिरात विसावली. पुढे साडेचार वाजता पालखी समाधी मंदिरातून गोदावरीच्या काठावर असलेल्या विसावा ओट्यावर थांबली. यावेळी पैठणकर आणि तालुक्यातील भक्त दर्शन घेत आहे. त्यांनतर पालखी पंढरपूरला मार्गस्थ होईल. यावेळी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. 


असा आहे पालखी सोहळा 


आज सायंकाळी सूर्यास्तवेळात शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा पवित्र पादुका पालखी सोहळा पंढरपूर येथील सोहळ्यामध्ये सहभाग घेण्यासाठी प्रस्तान होणार आहे. या पायी दिंडी पालखी सोहळ्यामध्ये जवळपास 30 ते 35 हजार महिला पुरुष वारकरी दरवर्षीप्रमाणे सहभागी होतात. या पालखी सोहळ्यामध्ये 19 ठिकाणी मुक्काम केल्यानंतर 20 वा मुक्काम थेट पंढरपुरात केला जातो. दरम्यान 9 जुलै रोजी नाथांची पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे. तर पहिला मुक्काम चनकवाडी येथे होणार असून, त्यांनतर पालखी पुढे पंढरपूरच्या दिशेने निघेल.


वारकऱ्यांची नाराजी... 


पहिल्याच मुक्कामाचे गाव असलेल्या चनकवाडी गावाला जाण्यासाठी वारकऱ्यांना रस्ता नसल्यामुळे तात्काळ पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी वारकऱ्यांकडून करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात कोणताही पर्यायी रस्ता तयार करून देण्यात आला नाही. त्यामुळे नाराज वारकरी आंदोलनाच्या पवित्र्यात होते. मात्र त्यांनतर प्रशासनाने केलेल्या चर्चेनंतर आणि अखंडित पालखी सोहळ्यात कोणताही खंड पडू नयेत म्हणून पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे पार पडला.यावेळी पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI