Karuna Sharma Atrocity: महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या करुणा शर्मा  यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील येरवडा पोलिस ठाण्यात एट्रॉसीटीचा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करुणा शर्मा यांच्याविरोधात येरवडा येथील एका महिलेने तक्रार दिली आहे. या महिलेने तक्रारीत करुणा शर्मावर धक्कादायक आरोप केले आहे. करुणा शर्माने शस्त्रे दाखवून शिवीगाळ, अपहरण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


तक्रारदार महिला आणि तिचा पती उस्मानाबाद येथे राहत होते. नोव्हेंबर 2011 मध्ये ती पतीसह करुणा शर्माला भेटली. फिर्यादीचा पती वारंवार करुणा शर्माच्या घरी राहायचा. त्यानंतर फिर्यादी व तिचा पती पुण्यात स्थायिक झाले. पती करुणा शर्मा यांच्याशी वारंवार बोलत होता. कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पतीने 16फेब्रुवारी 2022 रोजी फिर्यादीला भोसरी येथे नेले. या कार्यक्रमात करुणा शर्मा यांनी जातीवाचक शब्द वापरून तक्रारदार महिलेचा अपमान केला आहे. महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस आयुक्त किशोर जाधव करीत आहेत.


धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा वाद काय आहे?
करुणा शर्मांची बहीण रेणू शर्मा यांनी सर्वात गेल्या वर्षी ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंधाबाबत प्रकरण समोर आले. याला धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत पुष्टी दिली, तसेच त्यांचे कधीपासून सहसंबंध आहेत या संदर्भात देखील खुलासा केला. यात करुणा शर्मा यांच्यापासून धनंजय मुंडे यांना दोन अपत्य असल्याचे पहिल्यांदा धनंजय मुंडे यांनी फेसबुकवरून जाहीर केले होते. काही दिवसानंतर रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतली. येत्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत बीडमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध करुणा शर्मा अशी लढत शंभर टक्के होणार असल्याचं शिवशक्ती पक्षाच्या करुणा शर्मा यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे बीडकरांना 2024 साली नवरा विरुद्ध बायको अशी लढत पहायला मिळणार आहे.