पुणे : पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर तब्बल एक कोटी रूपयांचे सोनं तस्करी करणाऱ्या महिलेचं बिंग फुटलं आहे. कस्टम विभागानं 3 किलो सोन्यासह महिलेला जेरबंद केलं आहे.
रेहाना फैजान अहमद खान असं या महिलेचं नाव आहे. सिंथेटीक रबरची पेस्ट असलेल्या पिशव्या अंगावर गुंडाळून त्याच्या माध्यमातून महिला सोन्याची तस्करी करत होती. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीला अटक केली आहे.
जप्त केलेल्या सोन्याची भारतीय बाजारातील किंमत 98 लाख 83 हजार ऐवढी आहे. आरोपी महिला मुंबईतील कुर्ला परिसारातील रहिवासी आहे. काल (गुरुवार) पहाटे अबुधाबीवरून जेट एअरवेजच्या विमानाने ती पुण्याला आली होती. त्यावेळी तिच्यावर कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी अधिक तपास पुणे विमानतळावरील सीमा शुल्क विभाग सध्या करत आहे.