Pune Bypoll election : पुणे जिल्ह्यातील चिंचवड (pune bypoll election)आणि  कसबा पेठ  विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने मतदान संपण्याच्या 48 तास अगोदर म्हणजेच 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून  मतदानाच्या दिवशी 26 फेब्रुवारी 2023रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत आणि मतमोजणीच्या 2 मार्च 2023 रोजी मतमोजणीची प्रक्रिया संपेपर्यंत संपूर्ण मतदार संघ क्षेत्रातील सर्व किरकोळ मद्यविक्री बदं ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.


पुणे जिल्ह्यातील  चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारी 2023 रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. ही निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी निर्देशित कालावधीत आणि मतदार संघात सर्व किरकोळ मद्यविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. 


या कालावधीत निवडणूक परिसरातील सर्व देशी, विदेशी, बिअर, वाईन हे बंदच्या कालावधीत उत्पादन करु शकतील. परंतु या कालावधीत 'ड्राय डे' लागू असलेल्या क्षेत्रातील या विक्रेत्यांना देशी, विदेशी मद्याचा पुरवठा करता येणार नाही. या बंद कालावधीत मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यासह संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आलं आहे.



तक्रारीसाठी खास अॅप


कसबा आणि चिंचवडच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे, यासाठी  भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या  ‘सी-व्हिजिल’ ॲपवर मतदार संघात होत असलेल्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नागरिकांना नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे. या सुविधेमुळे अवैध बाबींवर तक्रार आणि कारवाई करणं सोपं होणार आहे.  जिल्ह्यातील चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून दिनांक 26 फेब्रुवारी 2023 रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन, अवैध जाहिरात फलक, मतदारांना पैसे वाटप, दारु वाटप, भेट वस्तू किंवा आमिष दाखवणे, कोणत्याही प्रकारचे शस्त्र दाखवून धमकावणे आदी प्रकारच्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने करता येतील. यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन ‘सी-व्हिजिल’ (cVIGIL) ॲप मोफत डाऊनलोड करता येते. हे अॅप डाऊनलोड करुन सर्व सामान्य नागरिकांनी तक्रारी नोंदवाव्या असं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे. 


संबंधित बातमी-


Pune Bypoll election : पुण्यात महाविकास आघाडीची प्रचाराची रणधुमाळी सुरु; संध्याकाळी 'हे' नेते मैदानात