Maharashtra Weather News : राज्यात तापमानात (Temperature) सातत्यानं चढ उतार होत आहे. कुठे थंडीचा कडाका (Cold Weather) जाणवत आहे. तर कुठे उन्हाचा चटका बसत आहे. या तापमानातील चढ उताराचा शेती पिकांना (Agriculture Crop) फटका बसत आहे. परभणी (Parbhani) जिल्ह्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला आहे. 15.6 अंश सेल्सिअसवरुन तापमानाचा पारा थेट 7 अंशावर आल्यानं हुडहुडी चांगलीच वाढली आहे. ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातही (western Maharashtra) थंडी कायम असल्याचं चित्र दिसत आहे. 


अचानक तापमानात मोठी घट झाल्यानं आजार बळावले


दरम्यान, परभणी जिल्ह्यात सोमवारी (13 फेब्रुवारी) तापमान हे  15.6 अंशावर होते. आत तापमानाचा पारा चांगलाच घसरला असून 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. परभणी जिल्ह्यात यंदा जानेवारी ते फेब्रुवारी हे दोन महिने कडाक्याच्या थंडीचे राहिले आहेत. या दोन्ही महिन्यात तापमान हे 10 ते 15 अंश सेल्सिअस दरम्यानच राहिले आहे. त्यातच अचानक तापमानात मोठी घट होत असल्यानं लहान मुले, वृद्ध नागरिकांना सर्दी, ताप खोकला असे आजार बळावले आहेत. तर हवेत कायमच गारवा राहत असल्याने दिवसभर थंडी जाणवत आहे..


पुण्याचा पारा 9 अंशावर 


परभणीत तापमानाचा पारा घसरला असताना दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातही थंडीचा जोर जाणवत आहे. पुण्यात 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळं पुण्यातही हुडहुडी वाढली आहे. पुणे जिल्ह्यात थंडी वाढल्यामुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. तसेच मुंबईत 19 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.  


शेती पिकांना फटका


राज्यात सातत्यानं तापमानात चढ उतार होत आहे. याचा शेती पिकावर मोठा परिणाम होत आहे.  बहुतांश भागात कांदा पिकावर करपा रोगाचा (Karpa) प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच गहू (Wheat), हरभरा, मका या पिकांना देखील या वातावरणाचा फटका बसणार बसत आहे. त्यामुळं उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


Maharashtra Temprature : 15 फेब्रुवारीनंतर तापमानात  वाढ होणार 


फेब्रुवारी महिन्यातील अवघे पंधरा दिवस संपलेले असताना आतापासूनच उन्हाचे (Heat) चटके बसू लागले आहेत. 15 फेब्रुवारीनंतर महाराष्ट्रातील तापमानात  वाढ होणार आहे. तर मुंबईतील थंडी गायब झाली असून किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. मुंबईतील तापमान गेल्या एक दोन दिवसांपासून वाढ होत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Weather: उन्हाळ्याची चाहूल, राज्यातील तापमानात 15 फेब्रुवारीनंतर वाढ होणार